पंतप्रधान मोदींचे युवराज सिंगला पत्र !

आजपर्यंत केलेल्या कामाचे चीज झाल्याच भावना युवीच्या मनात आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 2, 2017, 03:08 PM IST
पंतप्रधान मोदींचे युवराज सिंगला पत्र ! title=

नवी दिल्ली : अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅंसरसारख्या आजारावर मात करत जिद्दीच्या जोरावर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हे करत असताना 'युवुई कॅन फॉउंडेशन' च्या माध्यमातून त्याने जुलै २०१२ साली कॅन्सरग्रस्त लोकांसाठी सुरु केलेलं फॉउंडेशन केले. आतापर्यंत हजारो कॅंन्सरग्रस्तांना या संस्थेची मदत झाली आहे. 

युवीच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळे आजपर्यंत केलेल्या कामाचे चीज झाल्याच भावना युवीच्या मनात आहे. 

मोदींनी लिहिलेल्या पत्रात युवराज समाजासाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले आहे. 'युवी कॅन' हे फाउंडेशन करत असलेले काम हे कौतुकास्पद असल्याचंही मोदी म्हणाले.

खडतर काळातून प्रेरणा

कॅन्सरशी लढा हा युवीच्या आयुष्यातील खडतर काळ होता. या काळात युवराज सिंग अमेरिकेत उपचार घेत होता. तो महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंगच्या कॅन्सर लढ्यामुळे प्रभावित होऊन स्वतःही हे काम करू लागला. त्याने इतर कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून लढा उभारला. त्याच्या ट्विटर हॅन्डलचे नावही @YUVSTRONG12 हे लान्स आर्मस्ट्रॉंगच्या कार्याला प्रभावित होऊन घेतलेले आहे.