मुंबई : दिल्लीच्या ऋषभ पंतचं अर्धशतक आणि स्पिनरच्या शानदार कामगिरीमुळे मुंबईचा आयपीएल ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये ११ रननी पराभव झाला. या पराभवाबरोबरच मुंबईचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं. मुंबईच्या या पराभवामुळे राजस्थान किंवा पंजाब प्ले ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम बनणार होती. पंजाबचं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करणं त्यांच्या चेन्नईविरुद्धच्या मॅचवर अवलंबून होतं. मुंबईनं दिल्लीविरुद्धची आणि पंजाबनं चेन्नईविरुद्धची मॅच जिंकली असती तर मुंबई, पंजाब आणि राजस्थानच्या टीमकडे १४ पॉईंट्स झाले असते आणि नेट रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई प्ले ऑफला क्वालिफाय झाली असती. पण दिल्लीविरुद्ध पराभव झाल्यामुळे पंजाबसमोरचा एक अडसर दूर झाला होता. त्यामुळे पंजाबच्या टीमची मालकिण प्रिती झिंटा खुश झाल्याचं बोललं जात आहे. प्रिती झिंटा खुश झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत मात्र कोणतीही पुष्टी झालेली नाही. या व्हिडिओमध्ये कोणताही ऑडिओ नाही. ऑडिओ नसला तरी मुंबई आयपीएलबाहेर गेल्यामुळे मी खुश असल्याचं प्रिती म्हणाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Did #PreityZinta just say “I am just very happy that Mumbai is not going to the finals..Really happy” #CSKvKXIP #MIvsDD #IPL #IPL2018 pic.twitter.com/KWaxSUZYZh
— Jo (@jogtweets) May 20, 2018
प्रिती झिंटाचा मुंबईच्या पराभवाचा हा आनंद खरा असेल तरी तो औटघटकेचाच ठरला आहे. कारण चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा पराभव झाला आणि या पराभवानंतर पंजाबचंही प्ले ऑफला क्वालिफाय व्हायचं स्वप्न भंगलं. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा ५३ किंवा त्यापेक्षा अधिक रननं विजय होणं आवश्यक होतं पण पराभव झाल्यामुळे प्रितीच्या टीमला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही.