मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामात लिलावामध्ये पुन्हा एकदा युवराज सिंगची घरवापसी झालीये. आता तो पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.
शनिवारी झालेल्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला पुन्हा खरेगी केली. दरम्यान युवराजला अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पंजाबने त्याला दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइजसह संघात घेतले.
याआधी सुरुवातीला युवराज पंजाबकडून खेळत होता. मात्र त्यानंतर त्याने पुणे सुपरजायंटकडून खेळण्यास सुरुवाक केली. शनिवारी जेव्हा लिलाव झाला तेव्हा कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. पंजाबने त्याला बेस प्राईजवर खरेदी केली.
Yesssssss ! @YUVSTRONG12 is back home at @lionsdenkxip and I cannot be happier #LivePunjabiPlayPunjabi #VivoIPLAuction #BalleBalle
— Preity zinta (@realpreityzinta) January 27, 2018
युवराजला संघात घेतल्यानंतर संघाची मालकीण प्रीती झिंटाला आनंद गगनात मावेनासा झाला. तिने ट्विटरवरुन आपला आनंद व्यक्त केला. युवराजचे पुनरागमन झाले. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. बल्ले बल्ले....असे तिने ट्विटरवर म्हटलेय.