जयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 28, 2018, 01:23 PM IST
जयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी title=

मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.

जयदेवसाठी खरी चुरस

भारताचा क्रिकेटर जयदेव उनदकटसाठी या लिलावात खरी चुरस पाहायला मिळाली. आयपीएलच्या गेल्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंटकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. कदाचित याचमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानने जयचंदला घेतले. जयदेव यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय क्रिकेटर ठरलाय.

जयदेव संघातून जात आहे असे वाटत असतानाच...

जयदेव आपल्या संघातून जात आहे असे वाटत असतानाच राजस्थानने अखेरच्या क्षणी साडे अकरा कोटींची बोली लावली आणि संघात घेतले. जयदेवची बेस प्राईस १.५ कोटी रुपये होती. त्यानंतर बोलीला सुरुवात झाली. 

अखेरच्या क्षणी राजस्थानची बाजी

या बोलीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये खरी चुरस रंगली. दीड कोटीवरुन ही किंमत तब्बल ११ कोटींवर गेली. अखेरच्या क्षणी राजस्थान रॉयल्सने ११.५० कोटी रुपयांची बोली लावली आणि बाजी मारली. राजस्थान रॉयल्सने ११ कोटी ५० लाखाला खरेदी केले.