युवराज नव्हे तर या खेळाडूला संघात घेण्यासाठी उत्सुक होती प्रीती, असा डाव खेळला की...

किंग्ज इलेव्हन पंजाब संघात पुन्हा एकदा युवराज सिंगचे पुनरागमन झालेय. युवराज संघात आल्यानंतर मालकीण प्रीती झिंटाने याबाबत आनंद व्यक्त केला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 29, 2018, 11:12 AM IST
युवराज नव्हे तर या खेळाडूला संघात घेण्यासाठी उत्सुक होती प्रीती, असा डाव खेळला की... title=

नवी दिल्ली : किंग्ज इलेव्हन पंजाब संघात पुन्हा एकदा युवराज सिंगचे पुनरागमन झालेय. युवराज संघात आल्यानंतर मालकीण प्रीती झिंटाने याबाबत आनंद व्यक्त केला. 

अश्विनला संघात घेण्यासाठी उत्सुक होती प्रीती

किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदाच्या सीझनमध्ये १९ खेळाडू विकत घेतले. मात्र लिलावात असा एक खेळाडू आहे ज्याला संघात घेण्यासाठी प्रीती झिंटा सगळ्यात उत्सुक होती. त्याच्यासाठी ती कितीही रक्कम मोजण्यासाठी तयार आहे. तिच्यासमोर बोलीमध्ये सर्वात मोठे आव्हान होते ते धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज.

आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार स्पिनर आर. अश्विनबद्दल. अश्विन आतापर्यंत चेन्नई सुपर किंगमधून खेळत होता. मात्र यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईला त्याला रिटेन केले नाही. शनिवारी जेव्हा लिलावास सुरुवात झाली तेव्हा अश्विनचे नाव सुरुवातीलाच आले. 

चेन्नई आणि पंजाबमध्ये खरी चुरस

चेन्नईने लिलावाची रक्कम वाढवत नेली. अश्विनची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. त्यानंतर प्रीतीने लिलावाची बोली लावण्यास सुरुवात केली. पंजाब आणि चेन्नई यांच्यात बोलीच्या रकमेसाठी चुरस रंगली होती. जेव्हा बोलीची रक्कम ४ कोटी रुपयांवर पोहोचली तेव्हा चेन्नईने लिलावातून माघार घेतली. त्यानंतर इतरांनी बोली लावण्यास सुरुवात केली. मात्र प्रीती मागे हटण्यास तयार नव्हती. बोलीची रक्कम ७.६० कोटी रुपयांवर पोहोचल्यानंतर मात्र इतरांनी माघार घेतली आणि अश्विनला पंजाबने खरेदी केले. प्रीतीला कोणत्याही परिस्थितीत अश्विनला संघात घ्यायचे होते.