Maharashtra Kesri | कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला 2022 चा 'महाराष्ट्र केसरी'

Maharashtra Kesari 2022 | महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs नवी मुंबई अशी होती लढत

Updated: Apr 9, 2022, 08:41 PM IST
Maharashtra Kesri | कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला 2022 चा 'महाराष्ट्र केसरी' title=

सातारा : कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil ) यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज पाटीलने मानाची महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesri) गदा पटकावली आहे. पृथ्वीराजने थरारक झालेल्या अंतिम सामन्यात विशाल बनकरवर (Vishal Bankar) मात केली.

यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs नवी मुंबई अशी लढत झाली. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबसाठी सामना रंगला. नवी मुंबईच्या विशाल बनकरवर ५-४ नं मात केली आहे.

कोल्हापूरची 21 वर्षांची प्रतीक्षा यामुळे संपली आहे. हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्यानंतर पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे.

कोण आहे पृथ्वीराज पाटील ?

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणेचा पैलवान

कोल्हापूरच्या शाहु कुस्ती केंद्रात सुरूवातीचं प्रशिक्षण

बेळगावच्या द मराठा लाईट इन्फन्ट्रीत हवालदार

2020च्या सिनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक

2021च्या जागतिक ज्युनिअर अजिक्यपद स्पर्धेत कांस्य पदक

2021च्या नॅशनल ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक