चेन्नई : चेन्नई आणि कोलकात्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी बुट फेकला. कोलकाता टीम बँटींग करत असतांना आठव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार ही बुटं रवींद्र जडेजाला लक्ष्य करुन फेकली गेली. यानंतर आणखी दोन बुटं फेकण्यात आली जी फाफ डु प्लेसीला जाऊन लागली.
डु प्लेसी या सामन्यात खेळला नाही. पण या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत प्रेक्षकांमधून २ जणांना अटक केली. यानंतर चेन्नई टीमचे अधिकारी स्टेडियमजवळ पोहोचले आणि त्यांनी सीमारेषेवर उपस्थित लोकांना हटवलं. सामन्या आधी विविध पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कावेरी प्रबंधन बोर्ड (सीएमबी) आणि कावेरी जल नियामक समितीचं (सीडब्ल्यूआरसी) गठन न करण्याची मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती.
कावेरी वादात आंदोलनकर्त्यांनी चेन्नई टीमला देखील त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची मागणी केली होती. सुपरस्टार आणि नेता रजनीकांतने देखील चेन्नईच्या टीमला आंदोलनाला पाठिंबा देण्याचासाठी मागणी केली होती.