मुंबई : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही सिंधू सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. त्याचप्रमाणे सायना नेहलवालच्या कामगिरीकडेही सा-यांचच लक्ष असेल. सिंधूनं 2013 आणि 2014 मध्ये या टुर्नामेंटमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं.
2015 मध्ये सायनाला सिल्व्हर मेडलवर समाधाना मानाव लागलं होतं. सिंधूला या टुर्नामेंटमध्ये चौथं सीडींग देण्यात आलंय. तर सायनाला 12 वं सिडींग देण्यात आलं आहे. तर मेन्स सिंगल्समध्ये किदम्बी श्रीकांतकडून बॅडमिंटनप्रेमंनी मोठ्या अपेक्षा असतील. आता भारतीय बॅडमिंटनपटू या टुर्नामेंटमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरतात का ते पाहण महत्त्वाचं ठरेल.