अहमदाबाद : भारताचा ऑलराऊंडर आर अश्विनने टेस्टमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड ( IND VS ENG) कसोटीतील तिसरा सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर सुरु आहे. आर अश्विनने ४०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे.
भारतीय संघाचा ऑलराऊंडर रविचंद्रन अश्विन( Ravichandran ashwin)याने भारतासाठी ७६ टे्स्ट खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३९४ विकेट घेतले होते. मोटेरा स्टेडिअमवर सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याला ६ विकेटची गरज होती. अश्विन सर्वात जलद ४०० विकेट घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताचा दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे( anil kumble)च्या नावावर आहे. त्याने ८५ टेस्ट मॅचमध्ये ४०० विकेट घेतले आहेत.
Special bowler
Special milestone
Special emotionsTake a bow, @ashwinravi99! @Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the matchhttps://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/HkxrEiTFpo
— BCCI (@BCCI) February 25, 2021
याआधी झालेल्या दोन कसोटी सामन्यात दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२७ धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने पलटवार करत ३१७ धावाने विजय मिळवला. या विजय़ाचा शिल्पकार आलराऊंडर आर. अश्विनसमोर इंग्लंडच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले होते. तिसऱ्या टेस्टमध्ये ही अश्विनने जबरदस्त कामगिरी केली आहे.
भारतीय क्रिकेटर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran ashwin)कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४०० विकेट घेत न्यूजीलंडचा दिग्गज रिचड हेडली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेल स्टेनला मागे टाकलं आहे. स्टेन आणि हेडलीने ८० टेस्टमध्ये ४०० विकेट घेतल्या आहेत.
मुरलीधरन पहिल्या स्थानावर
क्रिकेटमध्ये सर्वात कमी टेस्ट सामन्यात ४०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड हा श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ७२ टे्स्ट मॅचमध्ये ४०० विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर आता अश्विनने ७७ व्या टेस्टमध्ये आपले ४०० विकेट पूर्ण केले आहेत.