मुंबई : भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सोमवारी श्रीलंकेविरोधात खेळताना सर्वाधिक वेळात ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या लिली या बॉलरनंतर १९८१ मध्ये ५६ टेस्ट मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला होता. या विक्रमानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर आर. अश्विनने ही किमया केली आहे.
आर. अश्विननेही हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत ट्विटरवर शेअर केला. सोबतच कर्णधार विराट कोहलीचे आभार मानले.
चाहत्यांकडून आर. अश्विनचे कौतुक होत असताना मात्र त्याच्या पत्नीनेच त्याला ट्रोल केले आहे. तिने आर. अश्विनला हा रिप्लाय दिला आहे.
Hey @ashwinravi99 , not trying to be a buzzkill here or take anything away from your 300 wickets but look! https://t.co/NF9tSActtX
— Prithi Ashwin (@prithinarayanan) November 27, 2017
आर. अश्विनसाठी ही ३०० वी विकेट खूपच खास आहे. लवकरच हा टप्पा अधिक मोठा करण्याचा त्याचा प्लॅन आहे. स्पिन बॉलिंग करणं अवघड आहे. मात्र त्याला मिळालेल्या आरामच्या काळाचा फायदा घेत ५० मॅचमध्ये हे कमावलं आहे.
आर अश्विनचे मुथय्या मुरलीधरन, रिचर्ड हेडली, मॅल्कम मार्शम आणि डेल स्टेन अशा आंतर राष्ट्रीय खेळाडूंचा रेकॉर्ड मोडला आहे.
अनिल कुंबले (619),
कपिल देव (434),
हरभजन सिंह (417)
जहीर खान (311)