नवी दिल्ली : भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड आपल्या खेळासोबतच साध्या राहणीसाठी नेहमी चर्चेत असतो. आपल्या मुलाच्या शाळेत गेल्यावर इतर पालकांसारख सर्वसाधारण पेहरावात तो दिसतो. त्याच्या साधेपणाची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. आयपीएल ११ मध्ये कोलकाता आणि बंगळूर आणि कोलकाताची मॅच पाहण्यासाठी राहुल हा बंगळूरच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर आला होता. पण सर्वात आश्चर्य म्हणजे स्पेशल बॉक्समध्ये न बसता तो सर्वसाधारण नागरिकांमध्ये जाऊन बसून मॅच पाहत होता.
That's Rahul Dravid in a queue with his kids at a science exibhition.
No show off;
no page 3 attitude;
no celebrity airs;
no "do you know who I am?" looks;
Queueing just like any other normal parent... really admirable... pic.twitter.com/NFYMuDqubE— South Canara (@in_southcanara) November 23, 2017
व्हिडिओ ट्विट
Look who's here to support the #RCB at Chinnaswamy #TheWall #TheLegend #RahulDravid. pic.twitter.com/N2MIRVeGQY
— IndianPremierLeague (@IPL) 29 April 2018
व्हीआयपी मॅच ऐवजी सर्वसाधारण जनतेसोबत मॅच पाहण द्रविडने पसंद केलं. सोशल मीडियावर द्रविड मॅच बघत असतानाचा फोटो व्हायरल होतोय. हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजणाला द्रविडबद्दलचा आदर आणखी वाढत आहे. आयपीएलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. 'बघा बंगळूरला सपोर्ट करायला कोण आलय ? द वॉलस द लिजेंड, राहुल द्रविड |' अशी कॅप्शन त्या व्हिडिओला देण्यात आली. द्रविड केवळ क्रिकेटसाठीच नव्हे तर माझ्या आयुष्यातीलही रोल मॉडेल असल्याचे एका चाहत्याने म्हटले.