मुंबई : अंडर 19 टीम इंडियाने नुकतंच वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला. कर्णधार यश धूळच्या नेतृत्वात टीम इंडियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. याच यशने फर्स्ट क्लास क्रिकेट डेब्यूत धमाका केलाय. यशने डेब्यूमध्येच खणखणीत शतक ठोकलंय. यशने रणजी स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना तामिळनाडू विरुद्ध ही कामगिरी केली. (ranji trophy del vs tml elite group h delhi yash dhull scored hundred in first class debut against tamilnadu at barsapara cricket stadium guwahati)
यशने सामन्यातील 45 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 2 धावा घेत शतक पूर्ण केलं. यशला शतक पूर्ण करण्यासाठी 133 चेंडूंचा सामना करावा लागला. यशने एकूण 150 चेंडूत 113 धावा केल्या. यामध्ये त्याने खणखणीत 18 फोर खेचले.
तामिळनाडूने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले. दिल्लीकडून यश आणि धुर्व शोरी ओपनिंगला आले. मात्र दिल्लीने 2 विकेट झटपट गमावले. मात्र यश एक बाजू लावून खेळत होता.
यश आणि नीतीश राणा या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करत दिल्लीचा डाव सावरला. यानंतर यशने जोंटी सिद्धूसोबत चौथ्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी केली. मात्र यानंतर काही ओव्हरनंतर आऊट होऊन तंबूत परतला.
सोशल मीडियावर कौतुक
पदार्पणातच खचखचीत शतक ठोकल्याने यशचं सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. तसंच तो ट्विटरवर ट्रेंडिगही होतोय.
on Ranji Trophy debut!
This has been a fantastic batting performance from Yash Dhull in his maiden First Class game. @Paytm | #RanjiTrophy | #DELvTN | @YashDhull2002
Follow the match https://t.co/ZIohzqOWKi pic.twitter.com/uaukVSHgUq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022