मुंबई : पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा भारताने 6 विकेट्सने पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने टी-20 सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीये. दरम्यान सामना सुरु असताना कर्णधार रोहित शर्मा भर मैदानात भडकला. टीम इंडिया फिल्डींग करत असताना रिव्ह्यू घेताना कन्फ्यूजन झाल्याने रोहित शर्मा चिडलेला दिसला.
यावेळी कर्णधार रोहित शर्मा अंपायरच्या निर्णयावर हैराण झाला होता. रोहित शर्माची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावेळी पटकन रोहित शर्मा ‘ये वाइड किधर दे रहा है यार’ असं बोलून गेला.
रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर हा प्रकार घडला. यावेळी अपील झाल्यानंतर टीम इंडिया रिव्ह्यू घेण्याच्या तयारीत होती. मात्र रोहित शर्मा रिव्ह्यू घेणार तितक्यात अंपायरने तो वाईड करार दिला. आणि तातडीने रोहित शर्मा असं बोलून गेला.
rohit and kohli lol pic.twitter.com/hZqMWPMJd0
— Aarav (@xxxAarav) February 16, 2022
त्यानंतर मात्र अंपायरना त्यांचा निर्णय बदलावा लागला. कारण रिप्लेमध्ये बॉल फलंदाजाच्या पॅडला लागला असल्याचं दिसून आलं. त्यानंतर अंपायरने त्यांचा निर्णय मागे घेतला.
दरम्यान सामना संपल्यानंतर रोहित शर्माने काही खेळांडूवर राग काढला. यावेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्याचा रोख कोहलीकडे असल्याची चर्चा आहे. वेस्ट इंडिजचं लक्ष गाठताना विराट कोहलीने 17 रन्स केले. तर त्यापाठोपाठ ऋषभ पंतही 8 रन्स करून माघारी परतला. या दोन्ही खेळाडूंमुळे सामना हरण्याची शक्यता वाटत होती.
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही खेळाडूचं नाव न घेता म्हणाला, 'आम्ही सामना थोडा लवकर संपवू शकलो असतो. मात्र आम्ही तसं केलं नाही. तरीही या विजयाने आम्ही खूश आहोत. यामुळे पूर्ण टीमला आत्मविश्वास मिळाला आहे. फलंदाजांनी त्यांच्यात थोडी सुधारणा करणं गरजेचं आहे.'