Kylian Mbappe : क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. स्टार फुटबॉलपटू किलिअन एम्बाप्पे अडचणीत सापडला आहे. एका हॉटेलमध्ये मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप एम्बाप्पेवर ठेवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून एम्बाप्पे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. एम्बाप्पेने स्विडिश वृत्तपत्र आफ्टनब्लेडेटच्या बातमीवर कठोर शब्दात निंदा केली आहे.
काय आहे प्रकरण?
स्विडिश वृत्तपत्र आफ्टनब्लेडेटमध्ये किलिअन एम्बाप्पेवर (Kylian Mbappe) बलात्काराचा आरोप करण्यात आल्याची बातमी छापून आली आणि एकच खळबळ उडाली. या बातमीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर एम्बाप्पेने ही संपूर्ण वृत्त खोटं आणि आणली बदमानी करण्याच्या हेतून छापण्यात आल्याचं म्हटलं आहे. स्विडनमधल्या एका हॉटेलमध्ये एम्बाप्पे त्याची मैत्रीण एका रात्रीसाठी थांबले होते, त्यावेळी एम्बाप्पे याने तिच्यावर बलात्कार केला असा आरोप या बातमीत करण्यात आला आहे.
एम्बाप्पेने आरोप फेटाळले
या बातमीनंतर एम्बाप्पेवर जगभराता टीका होऊ लागली आहे. पण एम्बाप्पेने यावर मौन सोडत आपली प्रतिमा बिघडवण्यासाठी असले घाणेरडे आरोप केले जात असल्याचं म्हटलं आहे. फ्रान्सच्या या प्रसिद्ध फुटबॉलपटूची खरी बाजू मांडण्यासाठी सर्व प्रकारची कायदेशीर बाजू मांडली जाईल असं एम्बाप्पेच्या टीमने म्हटलं आहे. एम्बाप्पेवर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहेत यासाठी कोर्टात धाव घेऊ असंही एम्बाप्पेच्या टीमने सांगितलं आहे.
एम्बाप्पेचा क्लबबरोबर वाद?
एम्बाप्पेवर एका फुटबॉल क्लबबरोबर पैशांवरुन वाद सुरु आहे. या वादातून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप किलिअन एम्बाप्पेने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
किलिअन एम्बाप्पे हा फ्रान्सचा फॉर्वर्ड पोझिशनचा खेळाडू आहे. जगभरातील प्रसिद्ध क्लबकडूनही एम्बाप्पे खेळतो.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.