लग्नाचं खोटं वचन देऊन 10 वर्ष बलात्कार; महिलेचे पाकिस्तानी क्रिकेटवर गंभीर आरोप

लैंगिक शोषण करून धमक्या दिल्याचा आरोप.

Updated: Jul 22, 2021, 09:04 AM IST
लग्नाचं खोटं वचन देऊन 10 वर्ष बलात्कार; महिलेचे पाकिस्तानी क्रिकेटवर गंभीर आरोप

मुंबई : सध्या टॉप क्रिकेटर्समध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमचं नाव घेण्यात येतं. तर आता पुन्हा एकदा बाबर आझमचं नाव चर्चेत आलं आहे. मात्र यावेळी खेळाच्या शैलीसाठी नव्हे तर महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे बाबर चर्चेत आला आहे. 

एका महिलेने पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेने बाबवर आरोप करताना म्हटलंय की, बाबरने माझं लैंगिक शोषण करून धमक्या देखील दिल्या. त्याचप्रमाणे बाबरने लग्नाची खोटी आश्वासनंही दिली होती. 

या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, बाबरने लग्न करतो असं सांगून 10 वर्ष बलात्कार केला. यानंतर मी गरोदर राहिली असता त्याने मला मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. बाबर आणि ही महिला एकाच शाळेत शिकत होते आणि एकाच भागात राहत होते. 

'Babar Azam ने शादी का झांसा देकर किया 10 साल तक रेप', महिला ने लगाए ये गंभीर आरोप

ही महिला पुढे म्हणते, बाबरने मला प्रपोजही केलं होतं. मी त्याला होकार देखील दिला होता. मात्र त्यावेळी त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली नव्हती. गरोदर राहिल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने त्याने गर्भपात केला असल्याचाही गंभीर आरोप या महिलेने केला आहे. 

"2017 मध्ये बाबरने त्याचा फोन नंबर बदलून टाकला. त्यानंतरही त्याने 3 वर्ष माझा फायदा घेतला. 2020 मध्ये त्याने माझ्याशी लग्न करण्यात नकार दिला", असंही या महिलेने म्हटलंय.

दुसरीकडे लवकरच बाबर विवाहबंधनात अडकणार आहे. बाबरच्या त्याच्या चुलत बहिणीशी लग्नगाठ बांधणार आहे. पाकिस्तानी वाहिनी जिओ न्यूजच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि त्याचे चुलत बहीणीचं कुटुंबिय या लग्नासाठी तयार झालेत. पुढच्या वर्षी दोघांचं लग्न होणार आहे.