IND vs AUS: शुभमनचा बचाव पण पुजारावर सडकून टीका; LIVE सामन्यात रवी शास्त्रींनी झाप झाप झापलं, म्हणाले...

WTC Final 2023 IND vs AUS: फलंदाजी करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. त्यामुळे आता रोहित विराटसह पुजारावर (Cheteshwar Pujara) देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सटकून टीका केली आहे.

Updated: Jun 9, 2023, 04:04 PM IST
IND vs AUS: शुभमनचा बचाव पण पुजारावर सडकून टीका; LIVE सामन्यात रवी शास्त्रींनी झाप झाप झापलं, म्हणाले... title=
Ravi Shastri On Cheteshwar Pujara

Ravi Shastri On Cheteshwar Pujara:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचा (World Test Championship Finals) दुसरा सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दिवशी वर्चस्व मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. मात्र, फलंदाजी करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. त्यामुळे आता रोहित विराटसह पुजारावर (Cheteshwar Pujara) देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सटकून टीका केली आहे.

काय म्हणाले रवी शास्त्री?

बॉल सोडणं ही मोठी चूक केली, त्या बॉलवर शॉट घ्यायला हवा होता. बॉल ज्या पद्धतीने सोडला त्यावरून ऑफ स्टंप दिसत होता. ही एक भयंकर चूक आहे. समोरून येणारा बॉल दोन्ही खेळाडूंनी सोडला होता, ही मोठी चूक झाली, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. 

दिनेश कार्तिक म्हणतो...

शुभमनने खेळलेला बॉल पहिला तर तो अफलातून होता. चौथ्या स्टंपकडे येणारा बॉल होता. मात्र टप्पा पडताच तो अनपेक्षितरित्या आत आला आणि विकेटवर लागला. मात्र, पुजाराच्या बाबतीत असं नाही. त्याचा बॉल अपेक्षित होता की तो आत येऊ शकतो. पुजाराला बॉल समजला नाही आणि विकेट गेली, असं दिनेश कार्तिक म्हणतो. 

आणखी वाचा - रोहित शर्मा हे काय करुन बसला? खेळाडूला शिवीगाळ करतानाचा Video Viral

दरम्यान,  पहिल्या चार फलंदाजांना 100 धावा देखील करता आल्या नाहीत.  रोहित शर्मा 15 धावा, शुभमन गिल 13 धावा,  चेतेश्वर पुजारा 14 धावा आणि विराट कोहली 14 धावा असा स्कोरबोर्ड होता. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यने 50 धाव पूर्ण केल्या आहेत. तर नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार शार्दुल ठाकूर 12 धावा करत त्याची साथ देत आहे.

टीम इंडिया (Playing XI):

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया (Playing XI):

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.