मुंबई: टीम इंडियाच्या खेळाडूंचे BCCIने रिन्यू केलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार नवे पगार सर्वांनाच माहिती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून BCCIकडे पाहिलं जातं. हेच BCCI टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री यांना सर्वात जास्त पगार देते. पाकिस्तानचे सध्याचे कोच मिस्बाह-उल-हकही टॉप -5 यादीत आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या कोचचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. रवि शास्त्री आणि या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोचच्या पगारामध्ये अर्धा टक्क्याचा फरक असावा अशीही चर्चा आहे.
पाकिस्तान टीमचे सध्याचे कोच मिस्बाह-उल-हकही आहे. गेल्या वर्षी मिकी आर्थर नंतर त्यांच्या खांद्यावर कोचची जबाबदारी आली. 46 वर्षांच्या मिस्बाह यांना पीसीबीकडून वर्षाला 1.79 कोटी रुपये पगार मिळतो.
श्रीलंकेचे कोच मिकी आर्थर या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. त्यांना वर्षाला 3.44 कोटी रुपये पगार मिळतो. श्रीलंकेच्या टीमने गेल्या 4 वर्षात 9 कर्णधार बदलले. तरी बांग्लादेश विरुद्ध आता नुकताच झालेला सामना देखील ते पराभूत झाले आहेत.
इंग्लंडचे कोच क्रिस सिल्वरवूड तिसऱ्या स्थानावर आहेत. ज्यांना वर्षाचा 4.65 कोटी रुपये पगार इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून मिळतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांना पराभूत केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर यांना 4.67 कोटी रुपये पगार वर्षाला मिळतो. त्यांनी 2018मध्ये ऑस्ट्रेलिया टीमच्या कोचची जबाबदारी स्वीकारली. न्यूझीलंड क्रिकेट टीमचे कोच गॅरी स्टीड यांना वर्षाकाठी 1.73 कोटी रुपये पगार मिळतो.
न्यूझीलंड क्रिकेट टीमचे कोच गॅरी स्टीड यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडचा संघ 2019 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता आणि आता त्यांना भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे आणि गॅरी स्टीडही यासाठी खेळाडूंची तयारी करून घेण्यात व्यस्त आहेत.
टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री या यादीमध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आहेत. त्यांना जवळपास वर्षाला 9.5 ते 10 कोटी रुपये पगार BCCIकडून मिळतो. 2017 पासून संपूर्ण टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी रवि शास्त्री यांच्याकडे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला आणि आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे.