अश्विनच्या पत्नीने शेअर केली हनीमूनची आठवण

टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनने १३ नोव्हेंबरला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. 

Updated: Nov 15, 2017, 05:07 PM IST
अश्विनच्या पत्नीने शेअर केली हनीमूनची आठवण

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनने १३ नोव्हेंबरला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. 

यावेळी त्यांच्या हनीमूनशी जोडलेली एक खास आठवण देखील शेअर करण्यात आली. अश्विनचं लग्न प्रीतिसोबत १३ नोव्हेंबर २०११ रोजी पार पडलं. मात्र त्यांच्या हनीमूनची एक हटके कहाणी आहे. टीम इंडियाच्या प्लेअरने मस्ती केली. जी मस्ती अश्विन आणि प्रीति आजपर्यंत विसरलेले नाहीत. अश्विनची पत्नी प्रीतिने यंदा हा राज सगळ्यांसमोर आणला. 

अश्विनने यंदा आपल्या पत्नीसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आणि त्याचवेळी अश्विनच्या पत्नीने टीम इंडियाच्या खेळाडूंना "शैतान" म्हणून सगळ्यांसमोर हे गुपित सांगितलं. सोमवारी अश्विनने शेअर केलं होतं की, आपल्या लग्नाला ६ वर्षे झाले. हा वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. कठिण प्रसंगात माझ्यासोबत राहिल्यामुळे आभार. त्यावर प्रीतिने देखील ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या आणि आपल्या कठिण प्रसंगात आपण दोघं एकत्र होतो असा विश्वास दिला. आणि ती पुढे म्हणाली की, आपल्या लग्नाला एवढे वर्ष झाले की आपण एकत्र डाएट करू शकतो. 

त्यानंतर तिने लग्नाचा फोटो शेअर करून आपल्या पहिल्या रात्री काय झालं होतं तुला आठवतंय का? सहा वर्षापूर्वी आपण लग्नानंतर कोलकाताला गेलो होतो. घरातल्यांनी सांगितलं की अश्विनचा उद्या सामना आहे त्याला झोपू द्या. मात्र त्या रात्री आपल्या खोलीत इतके अलार्म लावले होते ते संपूर्ण रात्र वाजत होते. चांगली गोष्ट ही होती की टीमची बॅटिंग त्या दिवशी होती.