याच थ्रोमुळे झालं जडेजाचं निलंबन

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात गैरवर्तणूक केल्यामुळे भारताचा खेळाडू रवींद्र जडेजाचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं.

Updated: Aug 7, 2017, 06:28 PM IST
याच थ्रोमुळे झालं जडेजाचं निलंबन  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात गैरवर्तणूक केल्यामुळे भारताचा खेळाडू रवींद्र जडेजाचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जडेजानं श्रीलंकेचा बॅट्समन पुष्पकुमाराच्या दिशेनं थ्रो भिरकावला. सुदैवानं हा थ्रो पुष्पकुमाराच्या शरिराला लागला नाही. पण बॉल अडवण्याच्या नादामध्ये विकेटकीपर वृद्धीमान सहाला दुखापत झाली.

दोन वर्षांच्या काळामध्ये दुसऱ्यांदा गैरवर्तन केल्यामुळे जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २४ महिन्यांच्या काळात जडेजाकडे ६ डिमेरीट पॉईंट्स झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मैदानामध्ये गैरवर्तणूक केल्यामुळे खेळाडूला अंपायर आणि मॅच रेफ्री डिमेरीट पॉईंट्स देतात.

कोलंबो टेस्ट खेळण्यापूर्वी जडेजाकजे तीन डिमेरीट पॉईंट्स होते. ऑक्टोबर २०१६साली इंदोरच्या मॅचमध्ये पिचवर धावल्यामुळे जडेजाला हे पॉईंट देण्यात आले होते.

जडेजानं मुद्दामहून हा प्रकार केल्याचं अंपायर रॉड टकर आणि ब्रुस ऑक्सेम्फर्ड यांना वाटल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. जडेजानंही त्याची ही चूक मान्य केली आहे. रविंद्र जडेजा हा आयसीसीच्या टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा बॉलर आहे. 

याच थ्रोमुळे रवींद्र जडेजाचं निलंबन