IPL 2021 : रविंद्र जडेजाचा व्हायरल व्हिडीओ, 'कॅच फोर' दाखवून सेलेब्रेशन

सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची प्रभावी फिल्डींग पाहायला मिळाली.

Updated: Apr 20, 2021, 02:50 PM IST
IPL 2021 : रविंद्र जडेजाचा व्हायरल व्हिडीओ,  'कॅच फोर' दाखवून सेलेब्रेशन

चेन्नई : सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची प्रभावी फिल्डींग पाहायला मिळाली. या सामन्यात रविंद्र जडेजाने एकूण चार कॅच घेतल्या आणि चेन्नईच्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

जडेजाचे अनोखे सेलेब्रेशन

या सामन्यात रवींद्र जडेजाने मनन वोहरा, रियान पराग, ख्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकटचे झेल पकडले. जयदेव उनाडकटला पकडल्यानंतर जडेजाने अनोख्या पद्धतीने सेलेब्रेशन केले. रवींद्र जडेजाचा हा सेलेब्रेशन पाहून सर्वांनाच आनंद झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे.

जाडेजाने फोन केला

रवींद्र जडेजाने कॅच घेतल्यानंतर चार बोटं दाखवली, ती त्याने यासाठी दाखवली की, त्याची या मॅचमधली 4थी कॅच होती. त्यानंतर रवींद्र जडेजानेही हाताने ‘कॉल’ करतोय असे हावभाव केले. जाडेजाच्या या सेलिब्रेशनमुळे सर्व चाहते देखील आनंदी झाले.

चेन्नईने हा सामना जिंकला

चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 45 धावांनी पराभव केला. टॅास गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 9 गडी बाद करुन188 धावा केल्या आणि राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 गडी  बाद 143 धावांवर रोखले. चेन्नईचा हा तीन सामन्यांमधील दुसरा विजय आहे आणि आता चेन्नईला चार पॅाइंट्स मिळाले असून तो टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. या मॅच नंतर राजस्थानला तीन सामन्यात दुसरा पराभव पत्करावा लागला आहे आणि टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.