मुंबई : चेन्नई सुपरकिंग्सला आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला विजय मिळाला. बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या नेतृत्वामध्ये 23 धावांनी विजय मिळवण्यात टीमला यश मिळालं. हा पहिला विजय चक्क जडेजानं आपला खास मित्र धोनीला समर्पित न करता खास व्यक्तीला केला.
रवींद्र जडेजानं हा पहिला विजय आपल्या पत्नीला समर्पित करण्याची घोषणा केली. हा आमचा पहिला विजय आहे. तो नेहमी खास असतो. त्यामुळे हा विजय मी माझ्या पत्नीला समर्पित करतो असंही जडेजा म्हणाला.
मागच्या 4 सामन्यात आम्हाला विजय मिळवता आला नाही. आम्ही टीम म्हणून मैदानात खूप चांगल्या पद्धतीनं उतरलो. उथप्पा आणि शिवमने उत्तम कामगिरी केली. या विजयात त्याचं योगदान खूप मोठं आहे.
4 सामने पराभूत होऊनही मॅनेजमेंटने आमच्यावर दबाव टाकला नाही. उलट आम्हाला सतत प्रेरणा दिली. महेंद्रसिंह धोनीसोबत मी बऱ्याचदा चर्चा करतो. नवी आव्हानं आणि जबाबदारी या दोन्ही एकावेळी पुढे घेऊन जाताना थोडा वेळ लागत आहे. मी अजूनही या सगळ्या गोष्टी शिकत आहे.
ड्रेसिंग रूममधील आमच्याजवळ अनेक अनुभव आहेत. त्यामुळे आम्ही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो घाबरत नाही. आम्ही सकारात्मक राहुन खेळण्याचा प्रयत्न करतो असंही जडेजानं म्हटलं आहे.