Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings : आयपीएल 2024 च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव (RCB Beat CSK) केला आहे. चेन्नईचा 27 धावांनी पराभव करून आरसीबीने प्लेऑफचं तिकीट (IPL Playoffs) मिळवलं आहे. तर यंदाच्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास थांबला आहे. सगल 6 सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर आरसीबीने सलग 6 सामने जिंकले अन् असंभव असा कमबॅक केला. 8 मे रोजी आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 3 टक्के असताना आरसीबीने संघाची ताकद दाखवली अन् आज आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर आरसीबी आणि चेन्नई यांच्यात 68 वा सामना खेळवला गेला. या सामन्यावरून प्लेऑफचा निकाल लागणार होता. प्लेऑफसाठी चेन्नईला 200 धावांच्या आत रोखण्याचं आरसीबीसमोर आव्हान होतं. बंगळुरूच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत चेन्नईला निकाल लावला. अखेरची ओव्हर यशस्वीरित्या टाकणारा यश दयाल (Yash Dayal) विजयाचा शिल्पकार ठरला.
seal the final spot for #TATAIPL 2024 Playoffs
TRENDING NOW
newsWhat a turnaround
Scorecard https://t.co/7RQR7B2jpC#RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/yHS7xnEn8x
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
आरसीबीने दिलेल्या 218 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. कॅप्टन ऋतुराज पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्यानंतर डॅनियल मिचेल याला देखील यश दयालने तंबूत पाठवलं. त्यामुळे चेन्नई अडचणीत आली होती त्याचवेळी रचिन रविंद्रने एक बाजू लावून धरली होती. मात्र, लॉकी फर्ग्युसनने अजिंक्य रहाणेला बाद केलं अन् सामना फिरवला. बंगळुरूने चेन्नईवर प्रेशर बनवलं अन् 15 व्या ओव्हरपर्यंत अर्धा संघ तंबूत पाठवला. जडेजा आणि धोनीने चेन्नईला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या ओव्हरमध्ये यश दयालच्या स्लोवर बॉलमुळे धोनीची विकेट गेली अन् आरसीबीने पारडं फिरवलं. अखेरला आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव केलाय.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आरसीबीने चांगली सुरुवात केली. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात पॉवर प्लेच्या पहिल्या 3 षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 31 धावांची भागीदारी झाली. पॉवरप्लेनंतर कोहली आणि डुप्लेसिसकडून तुफान खेळी झाली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. पाटीदारने या सामन्यात 23 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. दिनेश कार्तिक 14 धावा करून बाद झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने केवळ पाच चेंडूंचा सामना करत 16 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने दोन तर तुषार आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.
LIVE|
ZIM
(3.4 ov) 6/1 (48.5 ov) 125
|
VS |
NZ
601/3(130 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
WI
(49 ov) 280
|
VS |
PAK
284/5(48.5 ov)
|
| Pakistan beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 189/4
|
VS |
WI
176/6(20 ov)
|
| Pakistan beat West Indies by 13 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 133/9
|
VS |
WI
135/8(20 ov)
|
| West Indies beat Pakistan by 2 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.