Rishabh Pant ला 'ते' कृत्य पडणार महागात, एका सामन्याची लागणार बंदी?

अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच संतापला होता.

Updated: Apr 23, 2022, 11:01 AM IST
Rishabh Pant ला 'ते' कृत्य पडणार महागात, एका सामन्याची लागणार बंदी? title=

मुंबई : राजस्थान विरूद्धचा हातातोंडाशी आलेला सामना दिल्लीने अवघ्या 15 रन्सने गमावला. मात्र या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच तापला होता. या सामन्यात पंतने आपल्या टीमच्या खेळाडूंना मैदानातून परत बोलवून घेतलं. मात्र यानंतर ऋषभ पंतच्या कृत्यावर टीका करण्यात येतेय. 

शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल न दिल्याने ऋषभ पंतने फलंदाजांना डग आऊटमध्ये परत बोलावलं. पंतच्या या वागणुकीवर ट्विटरवर प्रचंड प्रतिक्रीया आल्या. यावेळी काही प्रमाणात सपोर्टही मिळाला आणि ट्रोलही झाला.

यावेळी सोशल मीडियावर एका युझरने, पंतचं हे कृत्य भयंकर आहे, या खेळाडूंना निलंबित केलं पाहिजे, असं म्हटलं आहे. तर अजून एका युझरने पंतवर एका सामन्याची बंदी घालण्याची मागणी केली आहे.

तर काहींनी पंतच्या कृत्याची मजा घेतली आहे.  एका युझरच्या म्हणण्यानुसार, नशीब हे गल्ली क्रिकेट नाहीये, नाहीतर पंत पॉवेलची बॅट घेऊन पळून गेला असता. यावेळी काहींनी पंतच्या या वागण्याचं समर्थन करत आपण त्याच्या सोबत असल्याचं म्हटलंय. 

नेमकं प्रकरण काय?

शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 रन्सची गरज होती. ओबेद मेकॉयला यावेळी 3 बॉलवर 3 सिक्स बसले. पण तिसरा बॉल नो बॉल असल्याचं पंत म्हणाला. मात्र अंपायरने तो नो बॉल दिला नाही. 

अंपायरच्या निर्णयावर चिडलेल्या पंतने आपल्या टीममधील खेळाडूंना क्रीझ सोडून बाहेर येण्यासाठी सांगितलं. कोचने मध्यस्ती केल्यानंतर पुढे मॅच सुरू झाली. अंपायर नो बॉल चेक करू शकला असता मात्र त्याने तसं केलं नाही.