या भारतीय खेळाडूने ठोकलं सर्वात जलद शतक

भारताच्या एका खेळाडूने ३८ बॉलमध्ये ११६ रन ठोकत नवा विक्रम केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 14, 2018, 03:17 PM IST
या भारतीय खेळाडूने ठोकलं सर्वात जलद शतक title=

नवी दिल्ली : भारताच्या एका खेळाडूने ३८ बॉलमध्ये ११६ रन ठोकत नवा विक्रम केला आहे.

सर्वात जलद शतक

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी२० टूर्नामेंटममध्ये दिल्लीचा विकेटकीपर ऋषभ पंतने हिमाचल प्रदेशविरुद्ध टी20 मध्ये दुसरं सर्वात जलद शतक ठोकलं आहे. पंतने नॉर्थ झोन टी20 लीगच्या या सामन्यामध्ये ३८ बॉलमध्ये ११६ रन केले आहे. टीमच्या विजयामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१४८ रन्सची पार्टनरशिप

कर्णधार पंतने आपल्या टीमसोबत रणजी ट्रॉफीच्या फायनलपर्यंतचा प्रवास केला होता. हिमाचलने आधी बॅटींग करत ८ विकेट गमावत १४४ रन केले. त्यानंतर गौतम गंभीर आणि पंतच्या ओपनिंग जोडीने १४८ रन्सची पार्टनरशिप करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

३२ बॉलमध्ये शतक 

पंतने त्याचं शतक ३२ बॉलमध्ये पूर्ण केलं. जे कोणत्याही भारतीय क्रिकेटर द्वारे टी-२० मध्ये केलेलं सर्वात जलद शतक आहे. २० वर्षीय पंतने नाबाद खेळी करत ८ फोर  आणि १२ सिक्स ठोकले. गंभीरने ३३ बॉलमध्ये ४ चौकारच्या मदतीने ३० रन केले.

गेलने ठोकलंय जलद शतक

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू क्रिस गेलच्या नावावर सर्वाधित जलद शतकचं रेकॉर्ड आहे. गेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध ३० बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. हिमाचलकडून निखिल गंगटाने ४० तर ओपनर प्रशांत चोपडाने ३० रन केले.