Rishabh Pant: ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा

Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला नाही. पंतला दंड ठोठावण्यात आला होता आणि आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर तीन सामन्यांतून एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

सुरभि जगदीश | Updated: May 13, 2024, 09:11 AM IST
Rishabh Pant: ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा title=

Rishabh Pant: आयपीएलच्या 62 व्या सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने प्लेऑफ गाठण्याच्या आशा अजूनही पल्लवित ठेवल्या आहेत. बंगळूरूने एम चिन्नस्वामी मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा 47 रन्सने पराभव केला. या सामन्यात दिल्लीच्या टीमची खराब फिल्डींग पहायला मिळाली. यावेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. याचं कारण म्हणजे त्याच्यावर एका सामन्याची बंदी होती. 

दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला नाही. पंतला दंड ठोठावण्यात आला होता आणि आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर तीन सामन्यांतून एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. बंगळूरू विरूद्ध पंतच्या जागी ऑलराऊंडर अक्षर पटेल टीमचं नेतृत्व करतोय. अक्षर पटेलच्या म्हणण्यानुसार, बंदीची बातमी ऐकून पंत फार संतापला होता.

पंतविषयी काय म्हणाला अक्षर पटेल?

अक्षर म्हणाला, 'ज्यावेळी त्यावर बंदी आणण्याची बातमी त्याने ऐकूली तेव्हा ऋषभ पंत संतापला होता. गोलंदाजांमुळे स्लो ओव्हर होतात आणि त्याची कर्णधाराला शिक्षा होते." 

अक्षर पुढे म्हणाला, 'पण तो मैदानावर आहे. तो आम्हाला डगआऊटमध्ये बसून पाठिंबा देतोय. त्याने आम्हाला सांगितलंय की, तो त्यांच्यासोबत नाही आणि खेळाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. 

दिल्लीने शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखाली खेळला. शेवटचीओव्हर टाकण्यापूर्वी त्यांच्या टीमला 10 मिनिटं उशीर झाला, मात्र त्यानंतर संघाने 20 रन्सने विजय मिळवला होता. आयपीएलने त्याला या विलंबासाठी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय सत्रात तिसऱ्यांदा हा गुन्हा केल्याबद्दल पंतवर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली.

आरसीबीकडून दिल्लीचा पराभव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 187 रन्स केले. यावेळी आरसीबीच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरने अर्धशतक झळकावलं. यावेळी शाई होप (29) सोबत पाचव्या विकेटसाठी केलेल्या 56 रन्सची पार्टनरशिप करूनही दिल्लीची टीम 19.1 ओव्हर्समध्ये 140 रन्समध्ये ऑलआऊट झाली. दुसरीकडे आरसीबीकडून रजत पाटीदार आणि विल जॅक यांनी तिसऱ्या विकेटसाठी 88 रन्सची भागीदारी केली. ज्यामुळे आरसीबीने नऊ विकेट्सवर 187 रन्स केले.