Rohit Sharma: शमीसमोर श्री रामाचे नारे...; प्रेक्षकांच्या 'त्या' कृत्यावर रोहितने दिलेल्या वक्तव्याने सर्वच हैराण

या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला होता.

Updated: Mar 14, 2023, 04:45 PM IST
Rohit Sharma: शमीसमोर श्री रामाचे नारे...; प्रेक्षकांच्या 'त्या' कृत्यावर रोहितने दिलेल्या वक्तव्याने सर्वच हैराण title=

Rohit Sharma: नुकतंच भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळण्यात आली. या सिरीजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली होती. या दोन्ही देशांमधील चौथा सामना ड्रॉ झाला. दरम्यान या सामन्यामध्ये स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांनी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोबत एक लज्जास्पद कृत्य केलं होतं. यावेळी चौथा टेस्ट सामना ड्रॉ झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कृत्यावर मौन सोडलं आहे. 

या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला होता.

प्रेक्षकांनी दिले जय श्री रामचे नारे

टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचे सर्व खेळाडू चाहापानानंतर मैदानावर पुन्हा परतत होते. यावेळी संपूर्ण टीम बाऊंड्री लाईनजवळ उभी होती. यावेळी सूर्यकुमार यादवला पाहताच स्टेडियममधील लोकं सूर्या सूर्या ओरडू लागले. यावेळी सूर्याने त्यांना हात जोडून अभिवादन केलं. यावेळी सूर्याच्या बाजूला मोहम्मद शमी (Mohammed Shami) देखील उभा होता. सूर्याच्या नाऱ्यानंतर प्रेक्षकांनी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम असे देवाचे नारे लगावणं सुरु केलं. ही गोष्टी तेव्हा अती झाली जेव्हा, प्रेक्षक शमीचं नाव घेऊन जय श्री राम ओरडू लागले. 

कर्णधार रोहित शर्माने दिली प्रतिक्रिया

मोहम्मद शमीचा हा व्हिडीओ व्हायरल झालेला दिसला. याच व्हिडीओ संदर्भात मिडीया रिपोर्टर्सने रोहित शर्माला प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मला शमीसमोर जय श्री राम असे नारे लगावल्याबद्दल माहिती नाही. मी ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकतोय. 

प्रेक्षकांचं शमीबद्दल केलेलं हे वागणं अयोग्य 

प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये घडलेलं हे दृश्य क्रीडाप्रेमी आणि मुस्लिम खेळाडूसाठी खूपच अस्वस्थ करणारं होतं. यावेळी प्रेक्षकांच्या या नाऱ्यांकडे दुर्लक्ष करत शमीने मैदानाकडे निघून गेला. दरम्यान हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.