कोरोना पॉझिटीव्हनंतरही Rohit Sharma खेळणार टेस्ट सामना, पण....!

कोरोनाची लागण झाल्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

Updated: Jun 26, 2022, 01:50 PM IST
कोरोना पॉझिटीव्हनंतरही Rohit Sharma खेळणार टेस्ट सामना, पण....! title=

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोहित शर्मा शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा 1 जुलैपासून होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या टेस्टमध्ये खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यासाठी त्याला कोरोनाच्या आरटीपीसीआर रिपोर्टची गरज आहे.

आरटीपीसीआर रिपोर्टची प्रतिक्षा

रोहित अजूनही 5वी कसोटी खेळू शकतो. मात्र परंतु त्याचा कोविड-19 अहवाल निगेटिव्ह आल्यावरच तो हा सामना खेळू शकणार आहे. वृत्तानुसार, रोहितची आरटीपीसीआर चाचणीही करायची आहे, ज्याचा अहवाल काही तासांत येईल. त्या अहवालातही तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची पाचव्या कसोटी सामन्यात सहभागी होण्याची शक्यता संपुष्टात येऊ शकते.

इंग्लंडविरूद्धची पहिली टेस्ट टीम इंडियाला रोहितविनाच खेळावी लागू शकते. पण अशा स्थितीत टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होतोय. अशावेळी ऋषभ पंत आणि विराट कोहलीची नावं चर्चेत आहेत. अधिककरून टीमचं नेतृत्व पंतकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.

रोहितला ही चूक पडली भारी?

भारत विरूद्ध इंग्लंड दौऱ्याच्यापूर्वी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला देखील कोरोनाची लागण झाली होती. शिवाय विराटलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. अशावेळी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्याचा विचार केला नाही. 

दरम्यान यावेळी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसले होते. या दोघांनीही फॅन्ससोबत सेल्फीही घेतला होता. यावरून बीसीसीआयने नाराजीही व्यक्त केली होती. तर आता टेस्ट सामना तोंडावर असताना रोहित शर्मा कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.