तिरुअनंतपुरम : तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर टीम इंडियाचं चाहत्यांकडून भव्य स्वागत करण्यात आलं. याठिकाणी हजारो लोक टीम बसभोवती जमले होते. केरळच्या चाहत्यांमध्ये विशेषत: टीमचा कर्णधार रोहित शर्माबद्दल खूप उत्साह होता. सामन्यापूर्वी रोहित शर्माचा मोठा कटआऊट होता. त्याचवेळी चाहत्यांनी रोहितला टीम बसमध्ये पाहिल्यानंतर त्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. याचवेळी एका चाहत्याने सामन्यादरम्यान सर्व मर्यादा ओलांडल्या.
वास्तविक, भारतीय टीमची गोलंदाजी संपताच एक चाहता स्टेडियमच्या सर्व मर्यादा ओलांडून मैदानावर पोहोचला, कारण त्याला रोहित शर्माला भेटायचे होतं. त्याने असं केलं आणि त्यानंतर मैदानावरच रोहित शर्माच्या पायाला स्पर्श केला.
दरम्यान त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. शिवाय या क्रिकेट चाहत्याला स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही, कारण हा एक प्रकारचा सुरक्षेचा भंग आहे.
Luckiest Fans
A fan breached into the stadium to meet Rohit Sharma #INDvsSA #RohitSharma pic.twitter.com/CZVJcDeiFo
— Ash...Rohitian (@ashrohitian2) September 28, 2022
अनेकदा क्रिकेट चाहते आपल्या फेवरेट क्रिकेटरला भेटण्यासाठी अशी कृत्यं करतात. मात्र, रोहित शर्मा हा वेगळा क्रिकेटर आहे. तो स्वत: मॅच संपल्यानंतर बहुतेक वेळा चाहत्यांना भेटण्यासाठी पोहोचतो, पण या चाहत्याला धीर नव्हता आणि तो मैदानात उतरला. अजूनपर्यंत त्या फॅनवर स्टेडियम प्रशासनाकडून कोणतीही तक्रार किंवा कारवाई झालेली नाही.
पहिल्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 107 रन्सचं माफक आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या विकेट्ससाठी नाबाद 93 रन्सची विजयी भागादीर केली.