Rohit Sharma : आज कोट्यवधींचा मालक, कधी काळी घरोघरी दूध विकायचा...आठवणीने हिटमॅन झाला भावूक

रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या खेळाच्या माध्यमातून उंच शिखर गाठलं आहे. मात्र त्याच्या या यशामागे प्रचंड मेहनत आणि खडतर प्रवास होता.

Updated: Mar 29, 2023, 08:00 PM IST
Rohit Sharma : आज कोट्यवधींचा मालक, कधी काळी घरोघरी दूध विकायचा...आठवणीने हिटमॅन झाला भावूक title=

Rohit Sharma Delivered Milk Packets : अनेकदा वजनामुळे किंवा काहीवेळा खराब फॉर्ममुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) ट्रोल करण्यात येतं. मात्र या ट्रोलिंगला रोहित देखील त्याच्या उत्तम खेळाने सडेतोड उत्तर देतो. रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या खेळाच्या माध्यमातून उंच शिखर गाठलं आहे. मात्र त्याच्या या यशामागे प्रचंड मेहनत आणि खडतर प्रवास होता. दरम्यान रोहितच्या या परिश्रमांचा खुलासा टीम इंडियाचा माजी खेळाडू प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) याने केला आहे.

रोहित शर्माने त्याच्या उत्तम खेळाच्या बळावर करियरमध्ये सर्वकाही साध्य केलं. भारतातील दिग्गज खेळाडूंमध्ये त्याचं नाव जोडलं जातं. मात्र प्रज्ञान ओझाने केलेल्या खुलास्यानुसार, रोहितचा आतापर्यंतचा प्रवास फारच खडतर होता. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार एकेकाळी दूध डिलीव्हर करायचा (Rohit Sharma Delivered Milk Packets In Order To Buy Cricket Kits) .

कधीकाळी हिटमॅन दूध पोहोचवण्याचं काम करायचा

ज्याप्रमाणे रोहितच्या क्रिकेट करियरमध्ये अडथळे आले, त्याचप्रमाणे त्याच्या जीवनातही अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. जिओ सिनेमाच्या एका शोमध्ये बोलताना टीम इंडियाचा माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने, रोहित शर्मा कसं लोकांच्या घरोघरी दूध पोहोचवायचा, हे त्याने सांगितलं आहे. 

प्रज्ञान ओझा म्हणाला, "रोहित शर्मा हा मिडल क्लास कुटुंबातील व्यक्ती होता. तो एकदा, क्रिकेट किटचं बजेट खूप लिमिटेड असल्याचं सांगताना भावूक झाला होता. इतकंच नाही तर त्याने दुधाच्या पिशव्या पोहोचवायचं काम केलं आहे. या फार जुन्या गोष्टी आहेत. त्यावेळ तो या कामातून मिळालेल्या पैशांमधून क्रिकेट कीट विकत घेऊ शकत होता."

आता मी रोहितला जेव्हा पण पाहतो, तेव्हा मला फार गर्व होतो. त्याच्या या प्रवासाची सुरुवात कुठे झाली होती आणि आता तो कुठे पोहोचला आहे, असं देखील ओझा म्हणाला. 

रोहित शर्मा आयपीएल खेळणार नाही?

आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या टीमला एका मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma IPL 2023) सिझनतील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. रोहित शर्मा हा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे रोहित सुरूवातीचे सामने खेळू शकणार नाहीये. दरम्यान रोहित शर्माच्या (Rohit Sharma IPL 2023) अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.