मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा बॅटिंग करताना अयशस्वी ठरला. ३ टेस्ट, ६ वनडे आणि ३ टी-20च्या या सीरिजमध्ये रोहितनं फक्त एका वनडेमध्ये शतक झळकवलं. पण कॅप्टन म्हणून रोहितनं असं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे जे धोनी आणि कोहलीलाही जमलं नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये विराट कोहली पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. विराटच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं होतं. कॅप्टन म्हणून रोहित शर्माची ही चौथी टी-20 मॅच होती. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ रन्सनं पराभव झाला. तसंच भारतानं ही सीरिज २-१नं जिंकली. याचबरोबर रोहित पहिल्या ४ टी-20 मॅच जिंकणारा भारताचा पहिला आणि जगभरातला सहावा कॅप्टन बनला आहे.
१ मिसबाह उल हक (पाकिस्तान)
२ कुमार संगकारा(श्रीलंका)
३ शाहिद आफ्रिदी(पाकिस्तान)
४ लसिथ मलिंगा(श्रीलंका)
५ सरफराज अहमद(पाकिस्तान)
६ रोहित शर्मा(भारत)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनंतर आता रोहित शर्माकडे श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. या सीरिजमध्येही चांगली कामगिरी करून हे रेकॉर्ड आणखी चांगलं करण्याची संधी रोहितकडे आहे.
श्रीलंकेविरुद्ध, कटक, २०१७- भारताचा ९३ रन्सनी विजय
श्रीलंकेविरुद्ध, इंदूर, २०१७- भारताचा ८८ रन्सनी विजय
श्रीलंकेविरुद्ध, मुंबई, २०१७- भारताचा ५ विकेट्सनी विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, केपटाऊन, २०१८- भारताचा ७ रन्सनी विजय