यावेळी रोहित शर्मा वस्तू नाही तर चक्क विसरला स्टेडियमचा रस्ता, Video सोशल मीडियावर Viral

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा डाव भारताने चांगलाच रंगवला आहे. या सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 19, 2024, 05:43 PM IST
यावेळी रोहित शर्मा वस्तू नाही तर चक्क विसरला स्टेडियमचा रस्ता, Video सोशल मीडियावर Viral  title=
Photo Credit: @CricCrazyJohns/ X

Rohit Sharma Forget the Way to the Ground: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात डाव फिस्कटल्यावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. भारतीय संघ पहिल्या डावात 46 धावांत सर्वबाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात खेळ सावरला.  पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा 12 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. पण त्याने नंतर अर्धशतक झळकावले. याच दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मैदानाचा रस्ता विसरल्याने दिसून येत आहे. 

रोहित शर्मा हा नेहमीच काही ना काही विसरत असतो. त्याच्या या विसरभोळेपणाची अनेक उदाहरणे आहेत. कधी तो आय पॅड विसरतो तर कधी बॅग विसरतो. पण यावेळी तो चक्क मैदानात जायचा रस्ताच विसरला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा स्टँडच्या मागून मैदानात जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसून येतेय की तो आपला मार्ग चुकला आहे. असं वाटत आहे की तो त्याच्या रणनीतींचा विचार करत चुकीच्या दिशेने जात आहे. दरम्यान, त्याच्या पाठोपाठ आलेल्या यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने कर्णधाराला चुकीच्या दिशेने जाताना बघतो. जुरेलने परत पाठी येऊन रोहितला योग्य मार्गाने मैदानात प्रवेश करण्यासाठी आवाज देतो. 

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

पंतच्या जागी ज्युरेलने स्वीकारली यष्टिरक्षणाची जबाबदारी 

ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली होती, कारण पंतला दुसऱ्या दिवशी गुडघ्याला दुखापत झाली होती. तिसऱ्या दिवशी पंत  यष्टीरक्षणासाठी मैदानात येऊ शकला नाही. मात्र, नंतर पंत फलंदाजीचा सराव करताना दिसला आणि त्याने चौथ्या दिवशी फलंदाजी केली. ऋषभ पंतने ९९ धावा केल्या. 

रोहितने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले

पहिल्या डावात अवघ्या 2 धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्माने शानदार खेळी केली. त्याने 63 चेंडूत 82.54 च्या स्ट्राईक रेटने 52 धावा केल्या.यामध्ये 8 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. या डावात रोहित शर्माच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि चेंडू बॅटला आदळल्यानंतर विकेट गेली.