Rohit Sharma VIDEO: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. तिसऱ्या टेस्टच्या पराभवानंतर टीम इंडियाने चौथ्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथी टेस्ट ही सिरीजसाठी निर्णायक असून या टेस्टमध्ये रोहित शर्माला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावेळी विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वतःवरच वैतागलेला दिसला.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र रोहित शर्मा खराब शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावून बसला. दरम्यान विकेट गेल्यानंतर रोहित स्वतःवर संतापलेला दिसला.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या टीमला 480 रन्सवर ऑलआऊट केलं. यानंतर टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी आले. दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 74 रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र रोहित शर्माच्या एका खराब शॉर्टमुळे त्याला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
चौथ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा चांगल्या लयीमध्ये दिसून आला. रोहित मोठी खेळी करणार अशी अपेक्षा होती, मात्र हिटमॅनने 21 व्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर कव्हरच्या वरून एक शॉट खेळला आणि विकेट गमावून बसला.
लाबुशनने कॅच पकडल्यानंतर रोहित पव्हेलियनमध्ये पतत असताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून आली. यावेळी रागाच्या भरात येऊन त्याने बॅट जोरात जमिनीवर आपटली. याशिवाय पॅडवरही बॅट मारून राग व्यक्त केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
gussa pic.twitter.com/DVHlAbLICw
— javed ansari (@javedan00643948) March 11, 2023
चौथ्या सामन्यामध्ये तिसऱ्या डावाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडिया मजबूत स्थितीत दिसून येतेय. भारताने 3 विकेट्स गमावले असून 289 रन्सवर खेळतेय. शुभमन गिलच्या शतकी खेळीने टीम इंडियाला मोठा फायदा झाला. भारत अजून 191 रन्स पिछाडीवर आहे. रोहित शर्माने 35, शुभमन गिल 128, चेतेश्वर पुजारा 42 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतलेत. तर क्रीजवर सध्या विराट कोहली आणि रविंद्र जडेजा आहेत. विराटने उत्तमरित्या अर्धशतक झळकावलं आहे.