Ind vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने फॅनचं फोडलं नाक

श्रीलंकेविरूद्धच्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका चाहत्याचं नाकं फोडलंय.

Updated: Mar 13, 2022, 01:11 PM IST
Ind vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने फॅनचं फोडलं नाक title=

मुंबई : बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये पिंक बॉल टेस्ट खेळली जातेय. श्रीलंका विरूद्ध भारत असा हा टेस्ट सामना खेळला जातोय. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका चाहत्याचं नाकं फोडलंय. यावेळी त्या चाहत्याला इतकी दुखापत झाली आहे की, या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करावं लागलंय.

क्रिकेटच्या या चाहत्याला नाकावर एक मोठा कट आला आहे. त्याला तातडीने रूग्णालयातंही दाखल केलं. यावेळी त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झाल्याचं देखील समोर आलं आहे. 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात पहिल्या दिवशी रोहित शर्मा फलंदाजी करत होता. यावेळी रोहितला शॉर्ट बॉल मिळाला जो त्याने मिड विकेटच्या वर मारला. हा बॉल थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. तेव्हाच एका एका प्रेक्षकाने हा बॉल कॅच करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बॉल त्याला कॅच करता आलं नाही. 

बॉल त्यावेळी या चाहत्याच्या नाकावर जाऊन बसला आहे. त्यामुळे त्याच्या नाकावर मोठा कट आला आणि रक्तस्राव झाला. लगेचच या व्यक्तीला रूग्णाला दाखल केलं आणि एक्सरे काढला. त्यावेळी त्यांच्या नाकाला फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं.

तर अशा पद्धतीने रोहित शर्माने एका चाहत्याचं नाक फ्रॅक्चर केलं आहे. मुळात यामध्ये रोहित शर्माची काहीही चूक नाही. कारण हा प्रेक्षक सामना पाहताना कॅच पकडायला गेला आणि तो चुकल्याने त्याच्या नाकावर बॉल लागला.