Ind vs SL : शतक हुकल्याचा मला पश्चात्ताप...; Shreyas Iyer चं मोठं वक्तव्य

पहिल्या डावात 92 रन्सवर श्रेयस स्टंप आऊट झाला आणि शतकापासून दूर राहिला.

Updated: Mar 13, 2022, 12:28 PM IST
Ind vs SL : शतक हुकल्याचा मला पश्चात्ताप...; Shreyas Iyer चं मोठं वक्तव्य title=

बंगळूरू : बंगळूरूमध्ये श्रीलंका विरूद्ध भारत ही पिंक बॉल टेस्ट खेळण्यात येतेय. कालपासून सुरु झालेल्या या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 252 धावांमध्ये आटोपला. यावेळी भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक म्हणजेच 92 धावांची खेळी केली. यावेळी अवघ्या 8 धावांसाठी त्याचं शतक हुकलं. याबाबत पहिल्या दिवसाच्या अखेरीस श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे. 

पहिल्या डावात 92 रन्सवर श्रेयस स्टंप आऊट झाला आणि शतकापासून दूर राहिला. मात्र शतक हुकल्याने श्रेयर अय्यर अजिबात नाराज झालेला नाहीये. सामन्यानंतर, मी टीमसाठी खेळतो, माझा खेळ स्वतःच्या रेकॉर्डसाठी नाही, असं विधान श्रेयसने केलं.

सामन्यानंतर झालेल्या प्रेस-कॉन्फरन्समध्ये श्रेयस अय्यर म्हणाला, "हो, शतक चुकल्याने मी निराश आहे. मात्र तुम्ही टीमच्या वतीने पाहिलंत तर आम्ही एका चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचलोय. टीमचा स्कोर 250 चांगला आहे. त्यामुळे मला पश्चाताप नाही"

जेव्हा मी मैदानावर असतो, त्यावेळी मी टीमसाठी खेळतो. मी स्वतःच्या रेकॉर्डसाठी खेळत नाही. माझ्यासोबतचे खेळाडू, कर्णधार आणि कोच यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आणि माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. ज्यावेळी मी 50 धावा केल्या त्यावेळी मी शतकाप्रमाणेच तो क्षण साजरा केला, असंही अय्यर म्हणाला.