रोहित, विराट T-20 संघातून कायमचे Out? रोहितने थेटच सांगितले, 'आम्ही 2 वर्षांपूर्वीच...'

Rohit Sharma Reaction On Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे 2022 पासून भारतीय टी-20 संघांमध्ये खेळलेले नाहीत. त्यांचा देशासाठी शेवटचा टी-20 सामना 2022 टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धची सेमीफायनलचा होता. टी-20 पासून दूर असण्यासंदर्भात रोहित स्पष्टच बोलला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2023, 10:14 AM IST
रोहित, विराट T-20 संघातून कायमचे Out? रोहितने थेटच सांगितले, 'आम्ही 2 वर्षांपूर्वीच...' title=
एका विशेष मुलाखतीमध्ये रोहित शर्माने केलं हे विधान

Rohit Sharma Reaction On Virat Kohli: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यामध्ये विजय मिळवून 5 सामन्यांची मालिका 2-2 च्या बरोबरीत आणली. या मालिकेमध्ये यशस्वी जयसवाल, शुभमन गील, तिलक वर्मा यासारख्या नवख्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच विराट कोहली मागील अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित आणि विराटला पर्याय शोधण्याचा निवड समितीचा प्रयत्न सुरु आहे. आता विराट आणि रोहितला कधीच टी-20 संघात स्थान मिळणार नाही अशी शक्यता, चर्चा आणि बातम्याही समोर आल्या. मात्र आता यावर रोहित शर्माने उघडपणे भाष्य केलं आहे. रोहित आणि विराट कायमचे टी-20 संघातून बाहेर पडलेत का या अर्थाच्या प्रश्नावर रोहितने थेट उत्तर दिलं आहे. 

निर्णयाचं समर्थन

रोहित शर्मा नुकताच मुंबईत दाखल झाला. त्याने दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये विश्वचषक स्पर्धेआधी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारताच्या मुख्य खेळाडूंना आराम देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचा दुय्यम संघ खेळत असल्याचा उल्लेख करत रोहितला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित शर्माने तो तसेच इतर वरिष्ठ खेळाडू (विराट कोहली) संघात का नाहीत याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

जडेजाचा केला उल्लेख

"मागील वर्षीही आम्ही असं केलं होतं. टी-20 वर्ल्डकप होता तेव्हा आम्ही एकदिवसीय क्रिकेट खेळतो नव्हते. आता आम्ही तेच करत आहोत. एकदिवसीय वर्ल्डकप आहे त्यामुळे आम्ही टी-20 पासून दूर आहोत. तुम्ही सर्व ठिकाणी क्रिकेट खेळणं आणि वर्ल्डकपसाठी तयार होणं दोन्ही करु शकत नाही. आम्ही हे 2 वर्षांपूर्वी ठरवलं होतं. जडेजा सुद्धा टी-20 खेळत नाहीय. तुम्ही त्याच्याबद्दल का नाही विचारलं? मला माहितीय तुमचं लक्ष आमच्यावर (मी आणि विराटवर) आहे. मात्र जडेजा सुद्धा खेळत नाहीय," असं रोहित म्हणाला. मागील काही काळामध्ये टी-20 संघासाठी रोहित आणि विराटचा विचार होत नसल्याचं दिसत आहे असं म्हणत विचारलेल्या प्रश्नावर रोहितने हे उत्तर दिलं होतं. 

नक्की पाहा >> ते दोघे खेळले Records इतिहासजमा झाले! यशस्वी-शुभमने मोडलेल्या विक्रमांची यादी; बाबर-रिझवनही पडले मागे

मी कधीच एकदिवसीय वर्ल्डकप जिंकलो नाही म्हणून...

2022 च्या टी-20 वर्ल्डकप उपांत्यफेरीच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतासाठी टी-20 खेळलेले नाहीत. आयसीसीच्या मालिकांमध्ये भारताला यश मिळत नसून हा दुष्काळ संपवण्याची आपली फार इच्छा असून आगामी विश्वचषकामध्ये हे करुन दाखवण्याची इच्छा असल्याचं रोहित म्हणाला. 2013 मध्ये भारताने आयसीसीची शेवटची ट्रॉफी जिंकली होती. "खरं सांगायचं तर मी कधीच (50 षटकांचा) वर्ल्डकप जिंकलेलो नाही. वर्ल्डकप जिंकणं हे माझ्यासाठी स्वप्न आहे. त्यासाठी लढण्यासारखं दुसरं सुख नाही. तुम्हाला वर्ल्डकप थाळीत सजवून दिला जात नाही. त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. 2011 पासून आम्ही तेच करत आहोत. आता आम्ही एकत्र हे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात लढू," असं रोहित म्हणाला.