Ind vs WI Yashasvi Jaiswal Post Match Interview: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासहीत भारताने मालिका 2-2 च्या बरोबरीत आणली आहे. लॉडरहिलमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने मालिकेतील चौथा सामना 18 चेंडू शिल्लक असताना 9 गडी राखून जिंकला. भारताने 179 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. भारतीय सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिलने पहिल्या विकेट्ससाठी 15.3 षटकांमध्ये 165 धावांची पार्टनरशीप केली. यशस्वीने 51 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावा केल्या. तर गिलने 47 चेंडूमध्ये 77 धावा केल्या. मालिकेतील पाचवा आणि निर्णयाक सामना लॉडरहिल मैदानातच खेळवला जाणार आहे.
यशस्वीने आपल्या दुसऱ्याच टी-20 सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने 165 च्या सरासरीने 84 धावा केल्या. या खेळीमध्ये यशस्वीने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ 14 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. या खेळीसाठी यशस्वीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीबरोबरच शुभमन गिलसोबत फलंदाजी करण्यासंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं.
"आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळं सोप नाही. मात्र मला मैदानात आनंद घेऊन खेळायचं आहे. मी हे करण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. मला यासाठी हार्दिक भाई आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना (सपोर्टींग स्टाफला) धन्यवाद म्हणायचं आहे. त्यांनी ज्यापद्धतीने माझ्याबरोबर सामन्याआधी चर्चा केली, मला विश्वासात घेतलं त्याचा फार सकारात्मक परिणाम झाला," असं यशस्वी म्हणाला.
टी-20 मधील फलंदाजीसंदर्भात बोलताना यशस्वीने, "मी संघाला आवश्यकता असते तशापद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी किती वेगाने धावा करु शकतो याचाच मी विचार करत असतो. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो. यासाठी खेळपट्टी समजून घेणं आवश्यक आहे. मी कायम जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार करुनच मैदानात उतरतो. गिलबरोबर फलंदाजीचा अनुभव फारच सुखद होता. कोणत्या गोलंदाजांवर तुटून पडायचं हे आम्हाला ठाऊक होतं," असंही सांगितलं.
पहिल्या 2 सामन्यांमध्ये यजमान संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती. मात्र त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत सलग 2 सामने जिंकून मालिका 2-2 च्या बरोबरीमध्ये आणली. आता शेवटच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार यावर ही टी-20 मालिका कोण जिंकणार हे अवलंबून आहे. याआधी झालेली एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिका भारताने जिंकली आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.