मोहाली : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला. विराटचा हा 100 टेस्ट सामना आहे. विराट कोहली आणि त्याचे चाहते गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून त्याच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा करतायत. 100 टेस्टच्या खास दिवशी तो शतक झळकावेल असं वाटत असताना विराट कोहली 45 रन्सवर बोल्ड झाला.
जेव्हा विराट कोहली बोल्ड झाला त्यावेळी टीम इंडियाचं ड्रेसिंग रूम आणि मैदानावर शांतता पसरली होती. दरम्यान यावेळी कर्णधार रोहित शर्माने दिलेलं रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं आहे. विराटची विकेट गेली तेव्हा रोहित ड्रेसिंग रूममध्ये उभा असून तो हैराण झाला आणि त्याने त्याचे हात डोक्यावर ठेवले.
Rohit Sharma's reaction for Kohli wicket pic.twitter.com/HrC4fp5A2g
— Troll MI Haters (@TrollMIHaterTV_) March 4, 2022
विराट कोहलीने मोहाली टेस्टच्या पहिल्या दिवशी 76 बॉल्समध्ये 45 रन्सची खेळी केली. यावेळी विराट चांगला खेळ करताना दिसला. त्याने 45 रन्सच्या या खेळीत 5 चौकार लगावले. यावेळी कोहली पुन्हा एकदा शकत झळकावणार का असं दिसत असतानाच तो बोल्ड झाला.
Rohit's Reaction After King Getting Out..! #VK100 pic.twitter.com/hbp1OgJdI5
— (@imsachinA25) March 4, 2022
दरम्यान या ऐतिहासिक सामन्यात विराट कोहलीने नवा आणि मोठा पल्ला गाठला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार रन्स करणारा विराट सहावा भारतीय खेळाडू बनला आहे.
भारतासाठी टेस्टमध्ये सर्वात जास्त रन्स मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहेत. सचिनने त्याच्या 200 टेस्ट सामन्यांमध्ये 15,921 रन्स केले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने 13,265 रन्स केले आहेत. यानंतर सुनील गावस्कर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या नावे 10,122 रन्स आहेत.
विराट कोहली व्यतिरिक्त वीवीएस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग यांनीही टेस्ट सामन्यात 8 हजार रन्सच्या धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर आता विराटनेही हा टप्पा गाठला आहे आणि तो सहावा खेळाडू बनला आहे.