रोहित शर्माने शेअर केला पत्नीसोबतचा हा सेल्फी

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याने आपल्या पत्नीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 8, 2017, 10:47 PM IST
रोहित शर्माने शेअर केला पत्नीसोबतचा हा सेल्फी  title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याने आपल्या पत्नीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

श्रीलंका दौ-यात ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडिया मायदेशी परतली. भारतात परतल्यानंतर रोहित शर्माने आपली पत्नी रितिकासोबत एक सेल्फी काढला आणि तो सोशल मीडियात शेअरही केला आहे.

रोहित शर्माने शेअर केलेल्या सेल्फीत दिसत आहे की, त्याने पत्नी रितिकाचे गाल पकडून फोटो क्लिक केला आहे. असे वाटत आहे की, रोहित आपली पत्नी रितिकाला झोपेतून जागे करत आहे.

 

This is us after an hour of sleep. The energy levels are clearly poles apart #SheMakesTravellingFun

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

रोहित शर्माने हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, पाहा एक तास झोप घेतल्यानंतर आमची अवस्था अशी झाली आहे. आमच्या दोघांचीही एनर्जी लेवल स्पष्ट दिसत आहे. या फोटोमध्ये रोहित एकदम फ्रेश दिसत आहे. मात्र, त्याची पत्नी रितिकाची झोप अपूर्णच असल्याचे दिसत आहे.

श्रीलंकेविरोधात झालेल्या या वन-डे सीरिजमध्ये रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे. त्याने सीरिजमध्ये दोन सेंच्युरी करत ३०२ रन्स केले.