IND vs BAN 2nd ODI Playing 11 : टीम इंडिया विरूद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये 3 सामन्यांची सिरीजमधील दुसरी वनडे उद्या शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. मुख्य म्हणजे, रोहित सेनेसाठी हा मुकाबला 'करो या मरो'च्या स्थितीचा असणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात एका विकेटने पराभव झाल्यानंतर उद्याची वनडे जिंकणं टीम इंडियासाठी (Team India) गरजेचं असणार आहे. सिरीज जिंकण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
उद्याच्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. रोहित शर्मासोबत ओपनिंगला पुन्हा शिखर धवन उतरण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप 2023 चा विचार करता टीमला ओपनिंग जोडी शोधणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हीच जोडी ओपनिंगला उतरणार आहे.
तिसऱ्या नंबरवर माजी कर्णधार विराट कोहली तर चौथ्या नंबरवर श्रेयस अय्यर उतरणार आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येईल तर एक अतिरीक्त फलंदाज म्हणून रोहित शर्मा ईशान किशन विचार करू शकतो.
न्यझीलंडच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर ऑलराऊंडर म्हणून एक चांगला पर्याय असू शकतो. तर दुसरीकडे शाहबाज अहमद म्हणून अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. झिब्माब्वे आणि वेस्टइंडिजविरूद्धच्या सिरीजमध्ये अक्षरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते.
दुसऱ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा गोलंदाजीची कमान ही मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि शार्दुल ठाकुर यांच्या खांद्यावर असणार आहे. गेल्या सामन्यात सिराजने 3 विकेट्स काढले होते. तर दीपक आणि शार्दूलने 1-1 विकेट घेतले होते.
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर.