Rohit Sharma: दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्माची 'ही' चूक भोवणार; टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार

Rohit Sharma: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि शुभमन गिलला स्थान दिलं. या दोन खेळाडूंची गेल्या सामन्यात कामगिरी खूपच खराब होती.

सुरभि जगदीश | Updated: Jan 4, 2024, 10:11 AM IST
Rohit Sharma: दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्माची 'ही' चूक भोवणार; टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार title=

Rohit Sharma: केपटाऊनमध्ये टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका आमने-सामने आहेत. या सिरीजमधील दुसरा टेस्ट सामना न्यूलँड्सच्या मैदानावर सुरु आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची टीम पूर्णपणे ढेपाळली. त्यानंतर टीम इंडियाचा खेळंही चांगला झाला नाही. अशातच दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव सुरु असून टीम इंडियाच्या फलंदाजांचा असाच खेळ राहिला तर हा टेस्ट सामनाही गमावण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि शुभमन गिलला स्थान दिलं. या दोन खेळाडूंची गेल्या सामन्यात कामगिरी खूपच खराब होती. गिलचा खेळ वनडे आणि टी-20 सामन्यात चांगला खेळ केला आहे. मात्र टेस्टमध्ये तो संघर्ष करताना दिसतोय. सेंच्युरियनमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये गिल केवळ 28 रन्स करू शकला. या युवा खेळाडूची गेल्या 4 टेस्ट सामन्यांमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचं दिसून येतंय.

प्रसिद्ध कृष्णाची खराब गोलंदाजी

डेब्यूच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने अतिशय खराब कामगिरी केली. भारताच्या पराभवाचे हे सर्वात मोठे कारण ठरले. दुसरीकडे 24 वर्षीय शुभमन गिलने आतापर्यंत 19 टेस्ट सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याने 31 च्या सरासरीने आणि 58.9 च्या स्ट्राइक रेटने 994 रन्स केलेत. या कालावधीत त्याने 2 शतकं झळकावली आहेत. दोघांचीही खराब कामगिरी माहिती असून देखील रोहितने त्यांना दुसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी दिली. या सामन्यात देखील या दोन्ही खेळाडूंना साजेशी कामगिरी करता आली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात देखील टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला तर त्याला कारणीभूत रोहित शर्माची ही चूक ठरू शकते. 

पहिल्या डावात भारताने 98 रन्सची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झालेली दिसून आली. अवघ्या 62 रन्समध्ये दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावले आहेत. मुकेश कुमारने 2 तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 36 रन्सची आघाडी आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस असून सामना संपणार का यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. 

दुसऱ्या टेस्टसाठी कशी आहे टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.