IPL 2024 Rohit Sharma: आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून चाहत्यांचं लक्ष मुंबई इंडियन्सच्या टीमकडे आहे. यंदा मुंबईची टीम रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नव्हे तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळतेय. हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याचा निर्णय चाहत्यांना मात्र काही मान्य नाही. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमने पहिला सामना गमावला. अशातच आता हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. अशातच आता रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपद मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आहे. गुजरातविरूद्धचा सामना मुंबईने 6 रन्सने गमावला. दरम्यान सामन्यानंतर चाहत्यांनी हार्दिकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं. आता रोहित शर्माला ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. यावर आता माजी दिग्गज खेळाडूचं वक्तव्य समोर आलं आहे.
गुजरात टायटन्सकडून मुंबईच्या पराभव स्वीकारावा लागला. यानंतर मुंबई इंडियन्स टीमविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी म्हणाला की, मुंबई इंडियन्सने त्यांचा पहिला सामना गमावल्याने थेट चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या नव्या कर्णधाराला थोडा वेळ दिला पाहिजे. पाच-आठ सामन्यांनंतर हार्दिकला अचानक कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माला कर्णधार बनवले तर आश्चर्य वाटेल. मला वाटतं की, मुंबई इंडियन्सने पुढचा विचार करून हार्दिक पांड्याकड टीमची धुरा सोपवली आहे. हार्दिकमध्ये सर्व क्षमता असून त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.
Tom Moody " Hardik Pandya has got a team that will back up and take away the pressure of inconsistent performances. He will have the support of the Indian and overseas players because he is a highly respected cricketer and a performer as an all-rounder "pic.twitter.com/1kKbAKf2Da
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) March 20, 2024
आयपीएल 2024 मध्ये, मुंबई इंडियन्सने प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामना खेळला. या सामन्यात हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये फ्लॉप ठरला. गोलंदाजी करताना हार्दिकने 3 ओव्हरमध्ये 30 रन्स देऊन एकही विकेट घेतली नाही. फलंदाजी करताना हार्दिकला केवळ 11 धावा करता आल्या. मात्र दुसरीकडे, रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात हिट ठरला. रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध 45 रन्सची तुफान खेळी केली.