रोहित शर्माचा पुन्हा केदार जाधववर निशाणा

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा केदार जाधववर निशाणा साधला आहे.

Updated: Dec 11, 2019, 05:56 PM IST
रोहित शर्माचा पुन्हा केदार जाधववर निशाणा title=

मुंबई : टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा केदार जाधववर निशाणा साधला आहे. केदार जाधव याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. केदार जाधवने कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातलं आहे. केदारने काळ्या रंगाची फ्रेम असलेला चष्माही परिधान केला आहे. केदारच्या याच फोटोवर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. 'जहेर भाई जहेर', असं रोहित केदारच्या या फोटोला म्हणाला.

रोहित शर्माच्या या कमेंटवर त्याच्या फॅन्सने उचलून धरलं. रोहित शर्मा कमेंटमध्येही सिक्सर मारतो, असं रोहितचे फॅन्स म्हणत आहे. रोहितचे फॅन्सच नाही तर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनीही केदारला या फोटोवरुन ट्रोल केलं आहे. 'कट्टी जहेर भय्या', अशी कमेंट युझवेंद्र चहलने दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Be fearlessly authentic Have a happy Monday!

A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

याआधीही रोहित शर्माने केदार जाधवला इन्स्टाग्रामवर त्याच्या फोटोवरुन ट्रोल केलं आहे. रणजी ट्रॉफीसाठी सराव करतानाचा एक फोटो केदारने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 'मैदानावर येणं चांगलं वाटतं. जे मला करायचं आहे, ते मी पसंद करतो,' असं केदार त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला. या फोटोमध्ये केदारच्या हातात बॅट आणि डोळ्यावर गॉगल होता. रोहित शर्माने केदार जाधवच्या या फोटोवर निशाणा साधला. 'पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा', अशी कमेंट रोहितने दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Feels good to be back on the field and do what I like to do. #ranjitrophy @sareen_sports

A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

width: 100%; height: 100%;

केदार जाधवचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. १५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी केदारची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. केदार जाधव हा वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये होता, पण वर्ल्ड कपमध्ये त्याची बॅट चालली नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.