मुंबई : टी 20 वर्ल्डकप 2021ची 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी मानला जाणारा पाकिस्तानशी खेळायचा आहे. यावर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानलं जातंय. दरम्यान वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाने आपली नवी जर्सी लाँच केलीये.
यावेळी टीम इंडियाच्या शिलेदारांचे नवी जर्सीतील फोटो व्हायरल झालेत. दरम्यान टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्माने फोटो काढताना असं काही केलं आहे, ते पाहून की भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा अभिमान वाटेल. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या नवीन जर्सीचा फोटो शेअर केला आहे, ज्यात विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसले. मात्र, रोहित शर्माने केलेल्या कृत्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले.
रोहित शर्मा नवीन जर्सीवर छापलेल्या 'इंडिया लोगो'कडे बोट दाखवत आहे, त्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्याची जोरदार स्तुती करत आहेत. एका युजरने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत म्हटलंय की, संघाचा उपकर्णधार जर्सीवर छापलेल्या 'इंडिया लोगो'कडे बोट दाखवत आहे, तर त्याचे बाकीचे सहकारी बीसीसीआयच्या लोगोकडे बोट दाखवतायत. रोहितला हे करताना पाहून अनेकजण पुन्हा एकदा त्याच्या देशभक्तीचे चाहते झाले आहेत.
2021च्या टी -20 वर्ल्डकपसाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह ग्रुप -2 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. क्वालिफायर फेरीनंतर, त्यात ब ग्रुपतील विजेत्या संघाचा आणि गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा समावेश असेल. दुसरीकडे, वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे गट -1 मध्ये आफ्रिकेचे संघ आहेत. क्वालिफायर टप्प्यानंतर, गट 'अ'चा विजेता संघ आणि गट 'ब'चा उपविजेता संघ जोडला जाईल.
टी 20 वर्ल्डकपच्या बाद फेरीचे सामने 10 नोव्हेंबरपासून सुरू होतील. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबरला तर दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला खेळली जाईल. त्याचबरोबर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. आयसीसीने 15 नोव्हेंबर हा अंतिम सामना राखीव दिवस म्हणून ठेवला आहे.