लखनऊच्या पराभवातला सर्वात मोठा खलनाय ठरला हा खेळाडू, कॅप्टन राहुल म्हणाला....

शेवटच्या 3 बॉलमध्ये असं काय घडलं ज्यामुळे स्टार खेळाडू ठरला टीमचा खलनायक

Updated: Apr 11, 2022, 09:47 AM IST
लखनऊच्या पराभवातला सर्वात मोठा खलनाय ठरला हा खेळाडू, कॅप्टन राहुल म्हणाला.... title=

मुंबई : लखनऊ टीमला अवघ्या 3 धावांसाठी सामना गमवण्याची वेळ आली. राजस्थान टीमने हा सामना 3 धावांनी जिंकला आहे. विजयाच्या अगदी जवळ असताना 3 बॉलने बाजी पलटली. या सामन्यात स्टार खेळाडूच हिरोवरून झिरो ठरला. पराभवानंतर के एल राहुलने मोठं विधान केलं आहे. 

लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या म्हणण्यानुसार, राजस्थानने 3 धावांनी रोमांचक विजय मिळवला. त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत जे कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात. त्यांच्याकडे हे कौशल्य आहे. आयपीएलच्या या सामन्यात राजस्थानने 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. 

लखनऊने 8 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. लखनऊ टीमला विजयापासून रोखण्यात कुलदीप सेनला यश मिळालं. शेवटच्या 3 धावांसाठी सामना गमवण्याची वेळ के एल राहुलवर आली. 

के एल राहुलकडून टीमचं कौतुक

ही टीम अशी आहे जी कधीच सामन्यातून बाहेर जाणार नाही. आम्ही सुरुवातील तेवढं चांगलं खेळलो नाही. पण 3 विकेट्स गमवूनही आम्ही विजयासाठी झटत राहिलो तेही शेवटच्या क्षणापर्यंत. मधल्या फळीमध्ये अजून चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. 

स्टोइनिस टीमला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याने 17 बॉलमध्ये 38 धावा केल्या. स्टोइनिसला शेवटी पाठवण्याचं कारण म्हणजे संकटाच्या वेळी तोच टीमला बाहेर काढू शकतो याची खात्री होती. त्याने पूर्ण प्रयत्नही केला मात्र त्याचे प्रयत्न अपूर्ण ठरले आणि 3 धावांनी पराभव मिळाला. 

राजस्थानच्या कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचं कौतुक के एल राहुलने केलं. 'सेनने पहिल्या तीन षटकांत चांगली गोलंदाजी केली. मी त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पाहिले होते. त्याच्याकडे चांगले कौशल्य आहे आणि तो भारतासाठी खेळू शकतो.