2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची

टाटा, बाय-बाय, खत्म? टीम इंडियाच्या 2 दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक? 

Updated: Jan 14, 2022, 08:19 PM IST
2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची title=

मुंबई : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुजारा आणि रहाणेला एक संधी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दिली होती. मात्र याच संधीची माती दोघांनी केली आहे. ऋषभ पंतने तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करून शकले नाहीत. 

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू झाला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या सीनियर खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण या दोघंही गेल्या अनेक महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. 

रहाणे-पुजाराकडून संधीची माती

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पाठिंबा मिळाला. या दोघांनाही तीनही कसोटी सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. शेवटच्या सामन्यात तर दोघांनाही चांगल्या धावा करता आल्या नाहीत. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कामगिरीवर नजर

चेतेश्वर पुजाराने कसोटी सीरिजमध्ये 0, 16, 3, 53, 43 आणि 9 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने 48, 20, 0, 58, 9 आणि 1 धावा केल्या. मात्र, निवडकर्त्यांना त्याच्याकडून अधिक अपेक्षा होत्या. या अपेक्षांना दोन्ही खेळाडू खरे उतरण्यात कमी पडले. 

संपुष्टात येणार 2 क्रिकेटपटूचं करियर

केपटाऊन कसोटी हा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. आतापर्यंत मिळालेल्या एकाही संधीचं पुजारा आणि रहाणेला सोनं करता आलं नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. 

कोण असणार रिप्लेसमेंट

श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी हे दोन्ही ज्येष्ठ खेळाडू बदलण्यासाठी उत्सुक आहेत. कानपूर येथे खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या कसोटीत अय्यरने शतक आणि अर्धशतक झळकावले होते. त्याचवेळी जोहान्सबर्गमध्ये हनुमा विहारीने संयमी खेळी खेळली.