महेंद्रसिंग धोनीचा डान्स तुम्ही पाहिलाय का? बायको साक्षीसोबत मजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

साक्षीसोबत महेंद्रसिंग धोनीचा जबरदस्त डान्स, कॅप्टन कूलचा हा हटके अंदाज तुम्हाला आवडला का? पाहा व्हि़डीओ

Updated: Jan 14, 2022, 06:36 PM IST
महेंद्रसिंग धोनीचा डान्स तुम्ही पाहिलाय का? बायको साक्षीसोबत मजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्याची चाहत्यांवरची जादू आजही कायम आहे. धोनी एक कॅप्टन म्हणूनच नाही तर उत्तम फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. धोनीसाठी चाहते खूप वेडे आहेत. धोनी आणि साक्षी आपले अपडेट्स सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

सध्या धोनीची चर्चा एक व्हिडीओमुळे होत आहे. यावेळी धोनीचा काहीसा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे. धोनी पांढऱ्या शर्टमध्ये साक्षीमागे एका कार्यक्रमात एन्जॉय करताना दिसत आहे. 

या कार्यक्रमात साक्षीसोबत धोनी डान्स करताना दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी तुफान पसंती दिली आहे. या व्हिडिओमध्ये धोनी पत्नी साक्षीसोबत पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. धोनीचे हावभाव या व्हिडीओमध्ये खूपच वेगळे आहेत. 

हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठल्या कार्यक्रमातील आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे सध्या धोनीच्या या व्हिडीओची चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babu Gsp (@babugsp07)