सारा तेंडुलकरकडून सोशल मीडियावर प्रेमाची कबूली, कोण आहे ती व्यक्ती जाणून घ्या

साराच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंत केलं जातं.

Updated: Nov 18, 2021, 08:04 PM IST
सारा तेंडुलकरकडून सोशल मीडियावर प्रेमाची कबूली, कोण आहे ती व्यक्ती जाणून घ्या title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा देव म्हणून ओळखल्या जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने काही वर्षांपूर्वी क्रिकेट जगताचा निरोप घेतला असला तरी त्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नसली. सचिन तेंडुलकर आजही अनेकदा चर्चेत राहतो, तर त्याची मुलगी सारा तेंडुलकरही रोज या ना कारणांमुळे चर्चेत असते! बॅट्समन सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही तिच्या सोशल मीडियावर लोकप्रिय खूप लोकप्रिय आहे आणि ती आपल्या फॉलोअर्ससाठी काहीना वा काही अपलोड करत असते.

साराच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंत देखील केलं जातं, त्यावर नेटकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स असतात, सध्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सारा तेंडुलकरनेही एक मोठा खुलासा केला आहे!

सोशल मीडियावर अनेकदा अशीच चर्चा सुरू असते की सारा तेंडुलकर कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे, अर्थात तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, तिचे नाव अनेक तरुणांसोबत जोडली गेले. मात्र ती कधीही तिच्या वतीने काहीही बोलली नाही.

परंतु आता तिने स्वतःच सोशल मीडियावर याबद्दल खुलासा केला आहे की, तिला खऱ्या आयुष्यात कोण सर्वात जास्त आवडते!

सोशल मीडियावर फोटो शेअर करत साराने तिच्या आवडीच्या आणि जवळच्या व्यक्तीबद्दल सांगितले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती सचिनची बायको आणि साराची आई अंजली तेंडूलकर आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर, अंजली तेंडुलकर नुकतीच 54 वर्षांची झाली आणि साराने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत 3 फोटो शेअर केली. हे फोटो शेअर करताना साराने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच कॅप्शनमध्ये लिहिले की, "जिथे ती आहे तिथे घरपण आहे. माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे!"