क्रिकेटच्या देवालाही खोट्या जाहिरातीचा फटका

 यानंतर सचिनने स्वतः यावर प्रतिक्रिया देत अशा गोष्टींचं आपण समर्थन करत नसल्याचं सांगितलंय.

Updated: Feb 25, 2022, 11:16 AM IST
क्रिकेटच्या देवालाही खोट्या जाहिरातीचा फटका title=

मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर सध्या एका गोष्टीने त्रस्त आहे. बनावट जाहिरात प्रकरणी सचिन तेंडुलकरचा फोटो वापरण्यात आला आहे. सोशल मीडियावर सचिनचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो कसिनोची जाहिरात करताना दिसतोय. दरम्यान यानंतर सचिनने स्वतः यावर प्रतिक्रिया देत अशा गोष्टींचं आपण समर्थन करत नसल्याचं सांगितलंय.

सचिनच्या सांगण्याप्रमाणे, ही बनावट जाहीरात असून सचिनची टीम याविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे.

सचिन म्हणतो की, मी कधीही वैयक्तिकरित्या दारू, जुगार तसंच तंबाखूचं समर्थन केलं नाही. माझ्या फोटोचा दुरूपयोग करणं दुःखद आहे. यासदंर्भात सचिनने ट्विट करत खुलासा केला आहे.

सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, माझ्या असं निदर्शनात आलंय की, सोशल मीडियावर अशा काही जाहिराती आहेत ज्यामध्ये माझा चेहरा मॉर्फ करून कसिनोची जाहिरात दाखवली जातेय. मात्र ती कधीही दारू, तंबाखू आणि जुगाराचं समर्थन केलं नाही. लोकांना भ्रमात पाडण्यासाठी माझ्या फोटोंचा गैरवापर केला जातोय. हे फार दुःखद आहे.

सचिनने पुढे म्हटलंय की, माझी टीम या संपूर्ण गोष्टीवर कायदेशीर कारवाई करणार आहे. तोपर्यंत सर्वांना माहिती देणं गरजेचं आहे.