सचिनचा 'पलटवार'; डोळ्यावर काळी पट्टी बांधून युवीला दिलं चॅलेंज

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: May 17, 2020, 10:03 AM IST
सचिनचा 'पलटवार'; डोळ्यावर काळी पट्टी बांधून युवीला दिलं चॅलेंज
मुंबई : 'युवी तू खूप सोप्प ऑप्शन दिलं होतं. म्हणून मी तुला थोडा कठिण पर्याय देतो. तुला नॉमिनेट करतोय माय फ्रेंड.. कम ऑन डू इट फॉर मी...!' हे शब्द आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे. सचिनने टीम इंडियाचा ऑलराऊंडर युवराज सिंहला चॅलेंजमध्ये पलटवार दिला आहे. या चॅलेंजने युवराज देखील सरप्राईज झाला आहे. 
 
शनिवारी सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिनने डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. हातात बॅट असून तो बॅटच्या एजने (Edge of Bat) चेंडू हवेत उडवत आहे. 

सचिनने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ३२ मिनिटांचा हा व्हिडिओ चेंडू हवेत उडवतानाचा आहे. यानंतर सचिनने युवीला आणखी एक चॅलेंज दिलं आहे. डोळ्यावर पट्टी लावून चेंडू हवेत उडवायचं आहे. हे चॅलेंज आता मी तुला दिलंय असं या व्हिडिओत सचिन म्हणतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I am challenging you back @yuvisofficial, but this time with a twist! All I can ask everyone to do is take care and stay safe!

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

कोरोना व्हायरसमुळे सगळेचजण घरी आहेत. असं असताना स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना चॅलेंज देत आहेत. जेणे करून आपला वेळ खूप छान जाईल. सेलिब्रिटीपाठोपाठ आता क्रिकेटर्सनी देखील सोशल मीडियावर एकमेकांना चॅलेंज दिलं आहे.