मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा काल वाढदिवस झाला. यानिमित्त सचिन तेंडुलकरवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सचिन तेंडुलकरचा लहानपणीपासूनचा मित्र विनोद कांबळी यानेही सचिनला हटके शुभेच्छा दिल्या. गाण्याच्या माध्यमातून विनोद कांबळीने सचिनला विश केलं. सचिन तेंडुलकरने मात्र विनोद कांबळीला धन्यवाद देताना त्याला जोरदार टोमणा मारला.
'याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना' हे गाणं म्हणत विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या गाण्याचा व्हिडिओ विनोद कांबळीने ट्विटरवर शेअर केला. या ट्विटला रिप्लाय देताना सचिन म्हणाला, 'वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, पण तुझ्या भुवयांचे केस काळे आणि दाढीचे केस पांढरे कसे याचं मला आश्चर्य वाटत आहे.'
Thanks for the wishes, @vinodkambli349. The song is great but I am still wondering why are your eyebrows still black when your beard is white. https://t.co/QmRUtdgbNe
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 25, 2019
१९८९ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सचिनची कारकिर्द २०१३ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष चालली. २४ फेब्रुवारी १९८८ रोजी सचिन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झळकला. सचिनने आपला मित्र विनोद कांबळी याच्यासोबत ६६४ रनची पार्टनरशीप केली. हॅरीस शिल्ड स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये सचिनने ३२६ आणि विनोदने ३४९ रन केल्या.